

Maharashtra SIR : महाराष्ट्रात आता तिसऱ्या टप्प्यातील मतदार याद्यांच्या 'स्पेशल इन्टेन्सिव्ह रिव्हिजन' (SIR) प्रक्रियेला सुरुवात होत आहे. यामध्ये निवडणूक कर्मचारी किंवा बीएलओ हे घरोघरी जाऊन मतदार याद्यांमधील प्रत्येक मतदाराची फेरतपासणी करणार आहेत. याप्रक्रियेत ते घरी आल्यानं चार प्रश्न नागरिकांना विचारणार आहेत. त्याचबरोबर यासाठी २००२ ची मतदार यादीचं मॅपिंग केलं जाणार आहे. अशा प्रकारे आणखी काही महत्वाच्या बाबी या एसआयआर प्रक्रिये दरम्यान पार पडणार आहेत, याची सविस्तर माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी दिली.
चोकलिंगम म्हणाले, एसआयआरमध्ये संपूर्ण मतदारयादी स्वच्छ करण्याची मोहिम राबवण्यात येणार आहे. दरवर्षी समरी रिव्हिजनसाठी निवडणूक अधिकारी घरोघरी येतात तेव्हा ते एवढंच विचारतात की, तुम्हाला या यादीतील नावात काय बदल करायचा आहे का? यामध्ये तुमचा पत्ता, फोटो, नाव बदललं आहे का? असा काही बदल असेल तर आम्ही फॉर्म भरतो किंवा भरत नाही. आता सखोल पडताळणीमध्ये काय करण्यात येणार तर आजच्या यादीत प्रत्येक मतदाराचा रेम्युनरेशन फॉर्म छापून तो घेऊन निवडणूक अधिकारी घरोघरी जातील आणि मतदारांना दोन प्रश्न विचारतील. यामध्ये पहिला प्रश्न आजच्या तारखेला सर्व माहिती बरोबर आहे का? की त्यात काही बदल करायचे आहेत. तसंच दुसरा प्रश्न हा ASDD (Absent, Shifted, Death, Duplicate) संदर्भातील असेल या निकषांमध्ये बसणाऱ्या मतदारांची नाव वगळण्यात येणार आहेत. त्यासाठी १ लाख २५३ बीएलओ काम करणार आहेत. हे काम मोठं असल्यास त्यांना मदतीस देखील देण्यात येणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात सध्या जनगणनेची घरोघरी जाऊन माहिती घेण्याचं काम सुरु आहे. त्यामुळं राज्य सरकारनं निवडणूक आयोगाकडं विनंती केली होती की, जनगणनेचं घरोघरी जाऊन माहिती घेण्याचं काम पूर्ण होईपर्यंत एसआयआरचं काम सुरु करु नये. त्याप्रमाणं निवडणूक आयोगानं ते मान्य केलं आहे. त्यामुळं सरकारच्या विनंतीला मान देऊन जनगणनेचं घरोघरी जाऊन माहिती घेण्याचं काम झाल्यानंतरच एसआयआरचं काम सुरु होणार आहे. त्यानुसार, ३० जून पासून २९ जुलैपर्यंत बीएलओ घरोघरी तपासणीसाठी येणार आहेत, या काळात मतदारांनी त्यांना कुठली माहिती द्यायची हे महत्वाचं आहे. ही माहिती पुढील प्रमाणे असेल, २००२ ते २००४ मध्ये एसआयआर झालं होतं, त्यावेळी तुम्ही कुठे होतात? असं हे बीएलओ विचारतील. हाच काळ का वापरेला आहे? तर या काळात देशभरात तुम्ही कुठेही राहत असला तरी चालू शकेल. हे शोधण्यासाठी निवडणूक आयोगानं आपल्या वेबसाईटवर संपूर्ण देशातील जिल्हानिहाय मतदार यादी उपलब्ध करुन दिली आहे.
पण जर मतदारांनी परराज्यातून महाराष्ट्रात स्थलांतर केलं असेल तर त्याची माहिती बीएलओना द्यावी लागेल, कारण बाहेरुन आलेल्या मतदारांची माहिती बीएलओना कळणार नाही. त्यामुळं याची माहिती मतदारांना स्वतःला द्यावी लागणार आहे. यामध्ये राज्य, मतदारसंघ, मतदान केंद्र आणि अनुक्रमांक ही माहिती जर प्रत्येक मतदारानं बीएलओना घऱी आल्यानंतर दिली तर हे पुरेसं आहे. हे याचसाठी सांगिलं जात आहे की नागरिकांना अद्याप हेच माहिती नाही की बीएलओ घरी आले तर नागरिकांनी नेमकं करायचं काय आहे?
त्याचबरोबर जर मतदारयादीत तुमनं नाव असेल तर त्यासाठी तुम्हाला कुठलाही कागद दाखवण्याची गरज नाही पण जर तुमचं नावच मतदार यादीत नसेल तर तुम्हाला काही कागदपत्रे द्यावे लागतील. यामध्ये जर काही बदल झालेला असेल तर त्यासंबंधिचं कागदपत्र सादर करावं लागणार आहे. जर एसआयर प्रक्रिये दरम्यान जर कोणी परदेशात जाणार असेल तर तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती तुमची माहिती देऊ शकते आणि सही देखील करु शकते. पण जर समजा या कालावधीनंतर जर तुम्ही परणार असाल तर ड्राफ्टमध्ये तुमचं नाव नसणार पण तुमचं नाव वगळलं जाणार नाही. पण तरीही आपली प्रक्रिया अंतिम होईपर्यंत तुम्ही फॉर्म ६ डिक्लेरेशनसह भरुन द्यायचं आहे.
२० ते २९ जून २०२६ : अर्ज छपाई आणि बीएलओंना प्रशिक्षण
३० जून ते २९ जुलै २०२६ : बीएलओ प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन जनगणना अर्ज वाटप आणि भरलेले अर्ज परत घेणार
५ ऑगस्ट २०२६ : अधिकृत प्रारूप मतदार याद्या (Draft Voter List) प्रसिद्धी केल्या जातील
५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ : मतदारांना प्रारूप यादीवर दावे अन् हरकती नोंदवता येतील
४ ऑक्टोबर २०२६ : सर्व दावे अन् हरकती निकालात काढले जातील
७ ऑक्टोबर २०२६ : महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी (Final Voter List) प्रसिद्ध केली जाईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.