पुणे पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच स्थायी समिती होणार अस्थायी ?

स्थायी समिती ही वैधानिक समिती असून ही समिती सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर नव्याने गठीत होणाऱ्या समितीपर्यंत अस्तित्वात राहिल, असा दावा सत्ताधारी भाजपाकडून करण्यात येत आहे.
Hemant Rasne
Hemant RasneSarkarnama
Published on
Updated on

पुणे : महापालिका प्रशासनाने स्थायी समितीच्या अस्तित्वाबाबतचा अभिप्राय मागविला असताना येत्या सोमवारी स्थायी समितीच्या अंदाजपत्रकाच्या बैठकीत अंदाजपत्रक सादर करणार असल्याचा पुनरूच्चार महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasne) यांनी केला.मुदत संपण्याच्या दिवशी (ता.१४) स्थायी समितीची बैठक असून या बैठकीत तो मान्य केला जाईल.त्यानंतर त्याचे काय करायचे, ते प्रशासनाने ठरवावे असे रासने यांनी स्पष्ट केले.

Hemant Rasne
राज ठाकरे यांनी केजरीवालांची शिकवणी लावावी ?

निवडणूक काळात नवीन महापालिका अस्तित्वात येत नाही. स्थायी समिती विसर्जित होत नाही, असा दावा करत महापालिकेची मुदत संपल्यानंतरही स्थायी समितीचे कामकाज सुरूच ठेवावे, असे पत्र स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे. त्यावर आता प्रशासनाने राज्यशासनाकडे धाव घेत या प्रकरणी मार्गदर्शन करण्याची मागणी नगरविकास विभागाकडे केली आहे.

Hemant Rasne
वजन का वाढले ? राज ठाकरेंनीच सांगितले कारण

पुणे पालिकेतील स्थायी समितीचा वाद राज्य सरकारच्या दारात पोहोचला आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ६ नुसार,महापालिकेची मुदत १४ मार्च रोजी संपत आहे.त्यामुळे पालिका सदस्यांकडे असलेली पदेही संपुष्टात येतील.या अनुषंगाने राज्याच्या नगरविकास विभागाने महापालिका आयुक्तांची प्रशासक म्हणून नियुक्तीही केली आहे.मात्र,या नियुक्तिला आक्षेप घेत स्थायी समिती अध्यक्ष रासने यांनी महापालिका आयुक्तांना नोटीसवजा पत्र पाठविले आहे. त्यात, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ३० मधील ३ पोटकलम २ नुसार,सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येतील तेव्हा स्थायी समितीचे जे सदस्य पदावर असतील तर ते पोटकलम २ नुसार, नवीन समितीची निवडणूक झाल्यावर आपल्या पदावरून रिक्त होतील, असे नमूद केले आहे.

स्थायी समिती ही वैधानिक समिती असून ही समिती सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर नव्याने गठीत होणाऱ्या समितीपर्यंत अस्तित्वात राहिल, असा दावा करण्यात आला.त्यानुसार, मार्गदर्शन व्हावे असे, पत्र पालिकेचे नगरसचिव शिवाजी दौंडकर यांनी राज्याच्या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना पाठविले आहे. त्यामुळे, शासनाच्या अभिप्रायानंतर स्थायी समिती अस्तित्वात राहणार की तीची मुदतही संपणार हा वाद निकाली निघणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com