राज ठाकरे यांनी केजरीवालांची शिकवणी लावावी ?

केजरीवाल यांच्याकडून राज ठाकरे यांचीच का शिकावे यामागे एक महत्वाचे कारण आहे.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

पुणे : सामान्य माणसाचे प्रश्‍न हाती घेऊन त्याच सामान्य माणसाला सत्तेत बसवून त्याच्या माध्यमातूनच सामान्यांचे प्रश्‍न सोडविण्याचा नवा प्रयोग देशाच्या पातळीवर अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी करून दाखविला आहे.दिल्ली पाठोपाठ पंजाबमध्येही हा प्रयोग यशस्वी झाल्याने त्याचे वेगळे महत्व आहे.महाराष्ट्रातल्या जनतेला मोठी अपेक्षा असलेल्या राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासारख्या नेत्याला केजरीवाल यांच्याकडून काही शिकता येईल का ? असा प्रश्‍न या निमित्ताने चर्चिला जाऊ लागला आहे.

Raj Thackeray
Dr.Bhagwat Karad : युपीनंतर महाराष्ट्रातही भाजपचे कार्यकर्ते सत्ता पालट करतील..

केजरीवाल यांच्याकडून राज ठाकरे यांचीच का शिकावे यामागे एक महत्वाचे कारण आहे. राज ठाकरे यांच्याबद्दल राज्यातल्या तरूणांमध्ये मोठी ‘क्रेझ’आहे. सत्तेत नसतानादेखील त्यांच्यावर तरूणांचा प्रचंड विश्‍वास असल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे.त्यामुळे राज्यातल्या सामान्य माणसाच्या प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी राज ठाकरे यांनी केजरीवाल यांच्या कार्यपद्धतीचा अवलंबून केला तर त्यांच्यामागे मोठे जनमत उभे राहू शकते. ठाकरे यांच्या पक्षाला तरूणांचा सर्वाधिक पाठिंबा आहे. सत्तेत नसतानादेखील त्यांच्या करिश्‍मा कायम आहे.राज्यातील तरूण आजही त्यांच्याकडे मोठया आशेने पाहात आहे, म्हणून राज ठाकरे यांच्यासाठी एक मोठी संधी आहे.

Raj Thackeray
प्रमोद सावंतांच्या हॅट्‌ट्रीकपुढे अनेक अडथळे होते; पण... : भेगडेंनी उलगडले विजयाचे गणित!

मोहल्ला क्लिनिक, महापालिकांच्या शाळांचे आधुनिकीकरण किंवा सरकारी कार्यालयातील जनतेच्या प्रश्‍नांची सोडवणूक असे साधे-सोपे पण अभिनव प्रयोग यशस्वी करून सामान्य माणसाची ताकद केजरीवाल यांनी आपल्यामागे उभी केली. त्यासाठी प्रचंड कष्ट घेतले. त्यातून त्यांचे राजकारण फुलत गेले. देश पातळीवर सलगपणे जेते ठरलेल्या पंतप्रधान मोदी यांनादेखील त्यांच्या या समाजकारणातून राजकारणातील यशावर मात करता आलेली नाही. दिल्ली सत्ता राबविताना शेजारच्या पंजाबमध्ये गेल्या आठ-दहा वर्षापासून केजरीवाल यांनी काम सुरू केले.त्यातून आजचे यश फलद्रूप झालेले दिसत आहे.

कामातील सातत्य आणि चिकाटी हे पंतप्रधान मोदी यांच्याप्रमाणेच केजरीवाल यांचे वैशिष्टय आहे. राज्यात यशस्वी होण्यासाठी मनसेच्या माध्यमातून राज ठाकरे ‘केजरीवाल पॅटर्न’ राबवू शकतात. राज यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचे राज्यभर जाळे हे ‘मनसे’चे वैशिष्टय आहे. तळागाळातील कष्टकरी कार्यकर्त्याचा त्यात भरणा आहे. त्यांच्यात राज ठाकरेंबद्दल मोठे आकर्षण आणि तळमळ आहे.त्यामुळे त्याचा उपयोग करून घेतल्यास ‘मनसे’ महाराष्ट्रात ‘आप’ची जागा घेऊ शकते.थोडक्यात काय तर ‘आप’च्या पद्धतीने काम करू पाहणाऱ्या कोणत्याही पक्षाला भवितव्य आहे.‘मनसे’ने हे काम केले नाही तर कालांतराने ‘आप’चे काम दिल्लीतून जसे पंजाबमध्ये विस्तारले तसे ते महारराष्ट्रासह देशातील इतर राज्यातदेखील विस्तारण्याची शक्यता अधिक आहे.

प्रतिकांच्या राजकारणातून बाहेर पडत सामान्य माणसाच्या कामाला प्रत्यक्ष भिडण्याची कला केजरीवाल यांनी अवगत केली आहे.ठाकरे यांच्या ‘मनसे’सह देशातील इतर प्रादेशिक पक्षांसाठी सत्ताधारी होण्याचे ‘केजरीवाल मॉडेल’ निश्‍चितपणे यश देणारे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com