Sameer Wankhede Case : वानखेडे खंडणी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'; "एनसीबीच्या उपमहासंचालकाला नऊ लाख दिले"

Sam D'Souza Petition : सॅम डिसुझाचा उच्च न्यायालयातील याचिकेत खळबळजनक दावा
Sam D'Souza
Sam D'SouzaSarkarnama

Sam D'Souza on Sameer Wankhede Case : आर्यन खान ड्रग्जप्रकरणी 'एनसीबी'चे माजी अधिकारी समीर वानखेडे यांची 'सीबीआय' चौकशी करत आहे. त्यानंतर समीर वानखेडे आणि शाहरुख खान यांच्यातील व्हॉट्सॲप चॅट्स व्हायरल झाले होते. आता याच व्हॉट्सॲप चॅट्सवरून वानखेडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. समीर वानखेडे आणि शाहरुख खान यांच्यातील व्हॉट्सॲप चॅट्सवर एनसीबीने आक्षेप नोंदवला आहे. दरम्यान, या प्रकरणात आरोपी असलेल्या सॅम डिसुझाने न्यायालयात मोठा दावा केला आहे.

Sam D'Souza
ED and Congress : राज्यातील काँग्रेसचा एकमेव खासदारही ईडीच्या रडारवर ? नेमकं काय घडलं ?

समीर वानखेडे (Sameer Wankhede) खंडणी आणि भ्रष्टाचार प्रकरणी सॅम डिसुझा आरोप आहे. त्याने उच्च न्यायालयात एक मोठा दावा केला आहे. उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत मुंबई तत्कालीन नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB)चे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

समीर वानखेडे खंडणी आणि भ्रष्टाचार (Bribr Case) प्रकरणातील आरोपी सॅम डिसुझाने उच्च न्यायालयात (High Court) याचिका दाखल केली आहे. त्यात डिसोझाने म्हटले आहे की, 2021 मधल्या एका प्रकरणात समन्स आले होते. ते समन्स आल्यानंतर एनसीबीचे तत्कालीन उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग यांना नऊ लाख रुपये दिले होते. याशिवाय अधिकारी व्ही. व्ही. सिंग यांना पाच लाख रुपये देण्यात आल्याचा याचिकेत दावा केला आहे.

Sam D'Souza
Rajasthan Politics : सचिन पायलट होणार PCC प्रमुख, गेहलोतांकडे राज्याचं नेतृत्व; काँग्रसने शोधला मधला मार्ग!

दरम्यान, आर्यन खान ड्रग्जप्रकरणी समीर वानखेडे यांच्याही अडचणीत वाढ झाली आहे. आर्यन विरोधात कारवाई न करण्याच्या बदल्यात २५ कोटी रुपयांची खंडणी मागीतल्याचा गुन्हा वानखेडे यांच्यासह अन्य चौघांवर दाखल करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमिवर सीबीआय वानखेडे यांची चौकशी करत आहे. आता सॅम डिसोझाने याचिकेत केलेल्या दाव्याने या प्रकरणात ट्विस्ट आला आहे. त्यामुळे या चौकशीत आणखी काय माहिती समोर येते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com