NCP Crisis : ‘त्याचा राजीनामा आजही माझ्या खिशात’; अजितदादा असं कोणाबद्दल म्हणाले?

Ajit Pawar News : आता दोन वेगवेगळे पक्ष झालेले आहेत, त्यामुळे ‘कुंपणा’वरील मंडळींनी आता ठरवायचे आहे, कुठे जायचे?
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून सुरू झालेली लढाई आता दोन पक्षांमध्ये विभागली आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि घड्याळ हे चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असे नाव दिले आहे. हे दोन्ही पक्ष वेगळे झाल्याने एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसणारे मित्र आता एकमेकांचे कट्टर विरोधक झाले आहेत. ('His resignation is still in my pocket'; About whom did Ajit Pawar say this?)

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा ताबा उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे दिल्याने जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्यापूर्वी पक्षाच्या असलेल्या जुन्या कार्यालयाचा ताबा शरद पवार गटाचे शहराध्यक्ष आणि माजी महापौर प्रशांत जगताप यांच्याकडे आहे. अजित पवार यांनी माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. पक्षाच्या कार्यालयाच्या जागेवरून जगताप आणि मानकर यांच्यात सध्या वाद सुरू आहे. (NCP Crisis)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit Pawar
Baramati Loksabha : बारामतीच्या उमेदवारीचा दौंड राष्ट्रवादीने संपवला सस्पेन्स; अजितदादांच्या निकटवर्तीयाने पटेलांना पाठविले 'हे' नाव

राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांना देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने तीन दिवसांपूर्वी घेतला. त्या निर्णयाचे पडसाद राज्यभरात उमटण्यास सुरुवात झाली आहे. त्याच दरम्यान शरद पवार समर्थकांनी शिवाजीनगर येथील राष्ट्रवादी भवनसमोर अजित पवार यांच्या विरोधात आंदोलन केले. त्यावेळी अजित पवार यांचे नाव असलेली कोनशिला फोडण्यात आली. त्यावरून अजित पवार आणि शरद पवार सर्मथकांमध्ये वादावादीही झाली होती. या संपूर्ण प्रकारावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे.

शरद पवार गटाने पक्ष कार्यालयाच्या कोनशिलेवरील तुमचं नाव हातोडी मारून काढले, असा प्रश्न अजितदादा यांना पत्रकारांनी विचारला असता ते म्हणाले, त्याला मी महापौर (प्रशांत जगताप) केले. शहराचा अध्यक्ष करण्यासाठी पुढाकार घेतला. पक्षातील कोणीही त्याला सपोर्ट करत नव्हतं. ‘मी एवढं काम करतोय, आंदोलने करतोय. तरीदेखील सर्वजण मला त्रास देत आहेत. त्यामुळे मी राजीनामा देतो,’ असं म्हणत त्याने (प्रशांत जगताप) माझ्याकडे त्याचा राजीनामा दिला होता. तो राजीनामा आजही माझ्याकडेच आहे. हा राजीनामा मी ठेवला आणि जयंत पाटील यांना सांगितले की, प्रशांतने जरी राजीनामा दिला असला, तरी तुम्ही त्याला समजून सांगा आणि मीही सांगतो. एवढ्या मोठ्या परिवारात थोडसं भांड्याला भांडं लागतं. एवढं काही मनावर घ्यायचं काही कारण नाही.

Ajit Pawar
Abhishek Ghosalkar Shot Dead : इतना सन्नाटा क्यो हैं भाई...? अभिषेकच्या हत्येनंतर घोसाळकर कुटुंबीय पुरते हादरले

मध्यंतरी त्याच्याबद्दल काही वेगळ्या बातम्या आल्या. काही निनावी पत्रंदेखील आली. एखादा कार्यकर्ता आपल्यासोबत काम करत असल्यावर त्याला नाउमेद करणं किंवा उघडं पाडणं, हा माझा स्वभाव नाही, त्याला सावरून घेतले, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. कोणी कुठे जायचे, हा ज्याचा त्याचा निर्णय आहे. त्यामुळे आपण कोणावर इकडेच थांब अशी जबरदस्ती केली नाही. आता दोन वेगवेगळे पक्ष झालेले आहेत. त्यामुळे प्रत्येक जण आपला निर्णय घेण्यास सक्षम आहे. ‘कुंपणा’वरील मंडळींनी आता ठरवायचे आहे, कुठे जायचे ते, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Edited By : Vijay Dudhale

R

Ajit Pawar
Abhishek Ghosalkar Case : अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण; नितेश राणेंच्या आरोपाने मोठी खळबळ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com