Nilesh Chavan Vaishnavi Hagawane Case : पोलिसांना चकवा देण्यासाठी निलेश चव्हाणकडून मैत्रिणीचा वापर! तपासात नवी माहिती आली समोर

Nilesh Chavan Police Vaishnavi Hagawane death Case : पिंपरी-चिंचवड पोलिसांनी निलेशच्या मैत्रिणीला ताब्यात घेत तपास केला तेव्हा तिला हगवणे प्रकरणाबाबत काही माहिती नसल्याचे समोर आले.
Nilesh Chavan is now under the scanner as police prepare to arrest him in connection with Vaishnavi’s suicide case.
Nilesh Chavansarkarnama
Published on
Updated on

Nilesh Chavan News : वैष्णवी हगवणे प्रकरणात तिच्या बाळाची हेळसांड करणारा तसेच तिच्या आई वडिलांना बंदुकीचा धाक दाखवणाऱ्या निलेश चव्हाणला पोलिसांनी नेपाळच्या सीमेवरून अटक केली. कोर्टाने त्याला तीन जूनपर्यंत कोठडी देखील सुनावली आहे. वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हे फारर होते मात्र पोलिसांनी त्यांना अटक केली. मात्र, निलेश चव्हाण हा पोलिसांना सापडत नव्हता. त्याचे कारण आता समोर आले आहे.

निलेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला. त्याने स्वतः फोन बंद ठेवला त्यामुळे तो पोलिसांना सापडत नव्हता. फरार होताना निलेशने त्याच्या मैत्रीणीला फिरायला जाऊया, असे सांगत सोबत घेतले. अन् तिला घेऊन तो दिल्लीला गेला.

आपला फोन बंद ठेवत त्याने मैत्रीणीच्या फोनचा वापर केला. मैत्रीणीला वैष्णवी हगवणे प्रकरणाबाबत काहीच माहिती नव्हते त्यामुळे तिने देखील निलेशला मदत केली. निलेश हा एका विशिष्ट व्यक्तीशी संपर्क साधेल याचा संशय पोलिसांना होता त्यामुळे पोलिसांनी त्या व्यक्तीवर लक्ष ठेवले. निलेशने त्या व्यक्तीशी मैत्रीणीच्या फोनवरून फोन केला आणि पोलिसांना कळले की निलेश दिल्लीमध्ये आहे.

Nilesh Chavan is now under the scanner as police prepare to arrest him in connection with Vaishnavi’s suicide case.
NCP Pune: राष्ट्रवादीचा शहराध्यक्ष कोण? दोघांमध्ये चुरस,अजितदादाचं धक्कातंत्र?

मैत्रिणीला परत पाठवले...

निलेशने मैत्रीणीला दिल्लीमधून परत जाण्यासाठी सांगितले तसेच स्वतः गोरखपूरला जाणाऱ्या बसमध्ये बसला. गोरखपूरमधून नेपाळला पळून जाण्याचा त्याचा प्लॅन होता. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी निलेशच्या मैत्रिणीला ताब्यात घेत तपास केला तेव्हा तिला हगवणे प्रकरणाबाबत काही माहिती नसल्याचे समोर आले. तसेच तिचा या प्रकरणाशी काही संबंध नसल्याचे देखील पुढे आले.निलेश प्रवास करत असलेल्या खासगी बस विषयी पोलिसांनी माहिती मिळाली आणि पोलिसांनी निलेशला बेड्या ठोकल्या.

पोलिसांना चकवा देण्यासाठी आखला प्लॅन

निलेश चव्हाण याने पोलिसांना चकवा देण्यासाठी नेपाळमध्ये पळून जाण्याचा प्लॅन आखला. पोलिस आपला मोबाईल ट्रेस करतील म्हणून त्याने फोन बंद ठेवला. तसेच पुण्यातून जाताना चार पाच फोन जवळ ठेवले आणि वेगवेगळी सीम कार्ड बाळगले.काही फोन आणि सीम कार्ड त्याने मित्रांकडून घेतले. नेपाळमध्ये देखील सीमकार्ड खरेदी केले. पैशांचे ऑनलाईन व्यवहारामुळे पकडले जाऊ याची भीती निलेशला होती त्यामुळे पुणे सोडत असताना त्याने लाखो रुपयांची कॅश आपल्यासोबत ठेवली. स्वतःच्या गाडीने प्रवास केला तर पकडले जाऊ हे ओळखून त्याने खास वाहन, ट्रॅव्हल्सने प्रवास केला.

Nilesh Chavan is now under the scanner as police prepare to arrest him in connection with Vaishnavi’s suicide case.
Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंनी 'वर्षा'वर पुरलेली रेड्याची शिंगे CM फडणवीसांना मिळाली? संजय राऊतांचे दोन प्रश्न अन् 'त्या' दाव्याने खळबळ

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com