Nilesh Ghaiwal Update : निलेश घायवळ प्रकरणात मोठा ट्विस्ट; भाजपने महाविकास आघाडीला ठरवले दोषी, आमदाराला उतरवले मैदानात!

BJP MLA Siddharth Shirole Blames Mahavikas Aghadi in nilesh ghaiwal Case : महाविकास आघाडीकडून हे आरोप सुरू असतानाच भाजपने आता या प्रकरणांमध्ये आमदारांना मैदानात उतरवला आहे.
Siddharth Shirole
Siddharth ShiroleSarkarnama
Published on
Updated on

Pune Newe : कुख्यात गुंड निलेश घायवळ बनावट कागदपत्रांच्या आधारे परदेशामध्ये पळून गेल्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोपांचा काहूर माजला आहे. निलेश घायवल याला परदेशात पळून जाण्यासाठी सरकारमधील काही नेत्यांनी मदत केली असल्याचा अप्रत्यक्षपणे आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.

महाविकास आघाडीकडून हे आरोप सुरू असतानाच भाजपने आता या प्रकरणांमध्ये आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना मैदानात उतरवला आहे. निलेश घायवळ याला पासपोर्ट मिळाला त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होतं. त्यामुळे याबाबतची चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावी अशी थेट मागणी शिरोळे यांच्याकडून करण्यात आली आहे.

पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, निलेश घायवळ याने बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट घेतला त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार राज्यांमध्ये होतं महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळातच निलेश घायवळ याला पासपोर्ट मिळाला आहे.

निलेश घायवळ हा मूळचा कर्जत जामखेड मतदार संघातील अहिल्यानगर सोनेगाव येथील रहिवासी आहे. त्याने पासपोर्ट देखील त्याच्या मूळ गावात तयार केला आहे. त्याच्यावर त्या मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल असताना आणि त्याने दिलेला पत्ता खोटा असताना देखील पोलिसांच्या व्हेरिफिकेशनच्या आधारे पासपोर्ट देण्यात आला होता. त्यामुळे स्थानिक पोलिसांनी कोणाच्या दबावाखाली हा रिपोर्ट दिला याबाबतची चौकशी होणे आवश्यक आहे.

Siddharth Shirole
Maria Corina Machado : 'नोबेल'मध्ये डोनाल्ड ट्रम्पना धोबीपछाड :'आयर्न लेडी'ची कामगिरी वाचून थक्क व्हाल!

जेव्हा पासपोर्ट देण्यात आला त्यावेळेस महाविकास आघाडीचे सरकार होतं तसंच कर्जत जामखेडमध्ये कोण आमदार होते? राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आणि मुख्यमंत्री कोण होते. त्यामुळे या प्रकरणांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशी करावी आणि प्रकरणात नेमकं कोण दोषी आहे हे शोधून काढावं अशी आमची मागणी असल्याचं सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितला आहे.

Siddharth Shirole
Pm Modi : पंतप्रधान मोदींकडून शेतकऱ्यांना 'दिवाळी बोनस'; मोठा प्लॅन तयार, काही तासांत करणार घोषणा!

या प्रकरणांमध्ये आत्तापर्यंत महायुतीतील नेत्यांवर टीका होत असताना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी या प्रकरणामध्ये आता स्थानिक आमदार रोहित पवार तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी या प्रकरणाची लिंक जोडली आहे. कुठेतरी महायुतीच्या नेत्यांवर होत असलेल्या आरोपांची दिशा बदलण्याचा हा प्रयत्न आहे का? असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com