Gangster's Wife Joins BJP : कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीचा चंद्रकांतदादांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश

चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ऑक्टोबर २०२१ मध्ये भाजपचा कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमातही गुंडांच्या पत्नींनी पाटील यांचा सत्कार केला होता.
Gangster Sharad Mohol's wife joins BJP
Gangster Sharad Mohol's wife joins BJPSarkarnama
Published on
Updated on

पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याची पत्नी स्वाती मोहोळ यांना गुरुवारी (ता. २० एप्रिल) भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश देण्यात आला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांच्या उपस्थितीत एका तडीपार गुंडाच्या पत्नीला पक्षात प्रवेश दिल्याने पुण्यात (Pune) एकच खळबळ उडाली आहे. (Notorious gangster Sharad Mohol's wife joins BJP in the presence of Chandrakant patil)

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली आहे. दरम्यान, पुणे शहर भाजपकडून गेल्या दोन वर्षांपासून त्यांचा पक्षप्रवेश टाळला जात होता. मात्र, तो अखेर खुद्द चंद्रकांतदादांच्या उपस्थितीतच झाला. विशेष म्हणजे या वेळी पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक हे स्थानिक नेतेही उपस्थित होते. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

Gangster Sharad Mohol's wife joins BJP
Pandharpur Politic's : ‘चंद्रभागा कारखाना लढू नका; विधानसभेला पंढरपूरऐवजी माढ्याचा विचार करा’ : भालके-काळेंकडून अभिजित पाटलांना अटी

चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ऑक्टोबर २०२१ मध्ये भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमाला काही गुंडांच्या पत्नीने हजेरी लावली होती. काही गुंडांच्या पत्नीने पाटील यांचा सत्कारही केला होता. त्यावरून पुण्यात प्रचंड गदारोळ झाला होता. त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी त्यावेळी तातडीने सारवासारव केली होती. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला होता, कुणाला पास वैगेरे दिले नव्हते, असे स्पष्टीकरण चंद्रकांत पाटलांनी त्या वेळी दिले हेाते. आता त्याच स्वाती मोहोळ यांना भाजपत प्रवेश दिला आहे.

Gangster Sharad Mohol's wife joins BJP
Bazar Samiti Election : माढ्यात शिंदे बंधू विरोधात सावंत बंधूंमध्ये काँटे की टक्कर : संजय शिंदेंच्या उमेदवारीने चुरस; साठेंची भूमिका निर्णायक

शरद मोहोळ याच्या विरोधात पुणे, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण पोलिस खून, खुनाचे प्रयत्न, खंडणी, अपहरण असे गुन्हे दाखल आहेत. पुणे जिल्ह्यातून जुलै २०२२ मध्ये पुणे शहरातून तडीपार करण्यात आले होते. तसेच, मोहोळ हा दहशतवादी कातील सिद्दीकी याच्या खुनातील आरोप आहे. कातील सिद्दीकी याचा पुण्यातील येरवडा कारागृहातच गळा आवळून खून झाला होता. त्याच मोहोळच्या पत्नीला भाजपने अखेर पक्षात प्रवेश दिला आहे.

Gangster Sharad Mohol's wife joins BJP
Bhandara APMC Election : भंडाऱ्यात भाजपची पुन्हा राष्ट्रवादीसोबत युती, फडणवीसांच्या ‘त्या’ वाक्याची झाली आठवण !

दरम्यान, नगरमधील एका कार्यक्रमात शरद मोहोळ हा मुख्यमंत्र्यांसोबत असल्याचा फोटो व्हायरल झाला होते. त्यामुळे त्याच्यावर आणखी एक गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यावेळी तो चर्चेचा विषय झाला होता. वास्तविक भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून हा पक्षप्रवेश गेली दोन वर्षांपासून टाळला जात होता. मात्र, चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित तो अखेर झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com