Laxman Hake - Sharad Pawar
Laxman Hake - Sharad PawarSarkarnama

OBC leader Laxman Hake : शरद पवारांनी माझं तिकीट फायनल केलं होतं, ओबीसी नेते हाकेंचा गौप्यस्फोट !

Maratha Vs OBC : मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण देऊ नये, अन्यथा ओबीसी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, अशी भूमिका घेत आंदोलन करणारे प्रा. लक्ष्मण हाके गेल्या काही दिवसांत चांगलेच चर्चेत आले आहेत.
Published on

Pune News : लोकसभा निवडणूक लढण्याची माझी इच्छा होती, त्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. पवारांनी माझी उमेदवारीही जाहीर केली होती. पण पुढे काय झालं त्यांनाच माहिती, असा गौप्यस्फोट ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्याचे हाकेंनी सांगितले आहे.

मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण देऊ नये, अन्यथा ओबीसी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, अशी भूमिका घेत आंदोलन करणारे प्रा. लक्ष्मण हाके गेल्या काही दिवसांत चांगलेच चर्चेत आले आहेत. ओबीसी समाजाच्या हक्कासाठी लक्ष्मण हाके यांनी उपोषण देखील सुरू केले होते.

त्यांच्या उपोषणाची दखल घेत राज्य सरकारने याबाबत सकारात्मक भूमिका घेत मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी (OBC) समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही. ओबीसीचे आरक्षण कमी करून मराठा समाजाला आरक्षण दिले जाणार नाही, अशी ग्वाही देत त्यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने हाके यांनी आपले उपोषण मागे घेतले.

Laxman Hake - Sharad Pawar
OBC leaders News : मुख्यमंत्र्यांपासून ते घनसावंगीच्या टोपेंपर्यंत सगळेच पडले पाहिजेत, ओबीसी नेते कडाडले !

ओबीसी समाजाच्या हक्कासाठी लढा देणारे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या वार्तालापाचा कार्यक्रम शनिवारी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी हाके यांनी विविध विषयांवर भाष्य करत मराठा समाजालाच्या आरक्षणासाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे या्ंच्यावर कडक शब्दात टीकेची झोड उठविली.

लोकसभा निवडणूक लढविण्याची आपली इच्छा होती. त्यामुळे आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती. त्यांनी माढा लोकसभेसाठी आपली उमेदवारीही जाहीर केली होती. मात्र पुढं काय झालं त्यांनाच माहित, असा गौप्यस्फोट हाकेंनी करत एकच खळबळ उडून दिली.

यावेळी बोलताना हाके म्हणाले ,ओबीसी समाजाचा प्रतिनिधी सभागृहात असला पाहिजे ही भावना समाजात नाही.धनगराने कुठे खासदार व्हायचे असते का? त्याने कुठे तिकिट मागायचे असते ? रामोश्याने काय लोकसभेचं तिकिट मागायचं असते का? असे प्रश्न विचारले जातात.ही समाजातली मानसिकता आहे.प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व दिले गेलं पाहिजे. त्यातून सामाजिक समतोल राखला जाईल,असेही ते म्हणाले.

Laxman Hake - Sharad Pawar
Manoj Jarange Emotional : हिंगोलीत मनोज जरांगे भावूक; मराठा समाजाला केलं मोठं आवाहन, म्हणाले...

हाकेंना मिळाली सहाव्या क्रमांकाची मते

माढा लोकसभेसाठी शरद पवारांनी आपली उमेदवारी जाहीर केल्याचा गौप्यस्फोट करणाऱ्या हाकेंनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती.त्यांचे निवडणुकीत डिपॉझिट देखील जप्त झाले असून त्यांना सहाव्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. मतदारसंघातून 32 उमेदवारांनी निवडणूक लढविली.अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या हाकेंना केवळ 5 हजार 134 मतं मिळाली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com