Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (ता. १ ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर आहेत. टिळक पुरस्काराने मोदींना सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार प्रमुख पाहुणे असणार आहेत. असे असले तरी मोदींविरोधात निदर्शने करण्याचा निर्धार महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटासह काँग्रेसच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी मोदींना काळे झेंडे दाखवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मोदींच्या दौऱ्यात कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी पुण्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावून त्यांना नजरकैदीत ठेवण्याचे नियोजन केले आहे. (Latest Political News)
पुणे दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान मोदींविरोधात महाविकास आघाडीतील नेते आंदोलन, मोर्चे किंवा काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करणार आहेत. दौऱ्यातील अनुचित प्रकार टाळण्यासाठी आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयाकडून संबंधित पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावून प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्याचे संबंधितांना कळवण्यात आले आहे. त्यानुसार पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात खासगी व सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित येण्यास मज्जाव करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
मणिपूर जळत असताना त्यावर पंतप्रधान मोदी बोलत नाहीत, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. हाच धागा पकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह महाविकास आघाडीतील पुणे पदाधिऱ्यांनी मोदींच्या पुणे दौऱ्याला कडाडून विरोध दर्शवला आहे. मोदींचा काळे झेंडे दाखवून निषेध करणार असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संबंधितांना नोटीस बजावून कायदा सुव्यवस्था आबाधित राखण्याचे आवाहन करून कायद्याचे उल्लंघन केले तर कारवाई करण्याचाही इशारा दिला आहे.
पोलिसांनी बजावलेल्या नोटिशीत म्हटले आहे की, 'सध्याची राजकीय परिस्थीती पाहता कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आपण कोणत्याही प्रकारचे आंदोलन, मोर्चे, निषेधाचे काळे झेंडे दाखवून आंदोलन करु नये. आपले सहकाऱ्यांकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कोणत्याही प्रकारे कायदा-सुव्यवस्थेचा व पोलिसांच्या आदेशाचा भंग होईल असे वर्तन करु नये. व्यक्ती, राजकिय पक्षाविषयी प्रक्षोभक वक्तव्य घोषणाबाजी, पुतळे किंवा प्रतिमांचे प्रदर्शन असे गैरकृत्य करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसे केल्याचे निदर्शनास आल्यास किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपणाला वैयक्तिकरित्या जबाबदार धरले जावून आपल्याविरुध्द कायदेशिर कारवाई करण्यात येईल.'
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.