राष्ट्रवादीच्या आंदोलनावर फडणवीसांचे एका वाक्यात उत्तर; म्हणाले...

रविवारी पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavissarkarnama

पिंपरी : पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उद्यान आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी बलिदान दिलेले अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्याचे उद्घाटन रविवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेसने आंदोलन केले.

या आंदोलनानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना काँग्रेस, आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. राष्ट्रवादीच्या आंदोलनामुळे संतप्त झालेल्या फडणवीसांनी हा विरोध म्हणजे यांची बुद्धी तपासून पाहायची आवश्यकता आहे, अशी तोफ डागली.

Devendra Fadnavis
पिंपरीत फडणवीसांच्या ताफ्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फेकल्या चपला आणि बांगड्या

दरम्यान, देवेंद्र फडणवीस विकासकामांचे उद्घाटन करत असताना कार्यक्रमस्थळी राष्ट्रवादी (NCP) आणि भाजपचे (BJP) कार्यकर्ते आमने-सामने आले. दोन्ही कडच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे गोंधळ निर्माण झाला. या वेळी फडणवीस यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर चपला आणि बांगड्या फेकण्याची घटना घडली. कार्यकर्ते एकमेकांविरोधात घोषणाबाजी करत असल्याने पोलिसांनी (Pimpri-Police) परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लाठचार्ज केला. यामुळे काहीकाळ पिंपरीमध्ये तणावाचे वातारवण झाले होते.

Devendra Fadnavis
फडणवीसांच्या दौऱ्यात भाजपने केली फिट्टंमफाट; राष्ट्रवादीला दिला मोठा धक्का

32 पैकी फक्त 12 किलोमीटरच्या अर्धवट मेट्रोमार्गाचे पालिका निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन केल्यामुळे कॉंग्रेसने (congress) मेट्रोच्या उदघाटनानंतर निषेध केला. कडक बंदोबस्त व परवानगी अभावी कॉंग्रेसने पुण्याऐवजी पिंपरी (Pimpri-Chinchwad) मेट्रो स्थानकात निषेध आंदोलन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com