Vaibhavi Deshmukh HSC Result : कसले पेढे ताई, सगळा आनंद हिरावून घेतलाय! सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन अन्...

Vaibhavi Deshmukh Achieves 85% in 12th Standard Examination : सुप्रिया सुळे यांनी पुण्यातून फोनवरून वैभवी देशमुख हिच्याशी संवाद साधत कौतुक केले.
Supriya Sule, Vaibhavi Deshmukh
Supriya Sule, Vaibhavi DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Supriya Sule's Personal Call to Vaibhavi Deshmukh : बीड मधील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी हिला इयत्ता बारावीच्या परीक्षेमध्ये 85 टक्के इतके गुण मिळाले आहेत. वडिलांच्या हत्येनंतर वैभवीने न्यायासाठी संघर्ष करत असतानाच मिळवलेल्या या यशाबाबत सर्व स्तरातून कौतुक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही वैभवीशी फोनवरून संवाद साधत तिचे कौतुक केले.

सुप्रिया सुळे यांनी पुण्यातून फोनवरून वैभवीशी संवाद साधला. तेव्हा सुप्रिया सुळे यांनी फोनवर वैभवीला पेढे कुठेत, अशी विचारणा केली. यावेळी वैभवी म्हणाली, सगळा आनंद हिरावून घेतलाय ताई, कसले पेढे. आता काय उपयोग. आता फक्त न्याय मिळायला हवा. हीच आपली अपेक्षा असल्याचं वैभवीने सांगितलं.

Supriya Sule, Vaibhavi Deshmukh
Vaibhavi Deshmukh HSC Result : वडिलांच्या हत्येनंतर बारावीची परीक्षा दिलेली वैभवी निकाल लागताच गहिवरली!रडत रडत म्हणाली,...

सुप्रिया सुळे यांनी तिचे कौतुक करताना तिच्या संघर्षाचाही उल्लेख केला. त्या म्हणाल्या, ‘तू इतका संघर्ष करून देखील इतके मार्क पाडले, त्यामुळे तुझं कौतुक करावं, तितकं कमीच आहे. तुझा खूप अभिमान आहे.’ त्यावर वैभवीने आपल्याला न्याय मिळायला हवा, असं सांगितलं. सुप्रिया सुळे यांनीही तुम्हाला नक्की न्याय मिळेल, तुझ्या आजीला मी त्याबाबतचा शब्द दिला आहे, असं आश्वस्त केले.

भविष्यामध्ये करिअरच्या बाबतीत काय करणार आहे, याबाबत सुप्रिया सुळे यांनी विचारणा केली. तसेच जो काही निर्णय घेशील, त्याबाबत कळवा असं सांगत शैक्षणिक मदतीचा हात सुप्रिया सुळे यांनी पुढे केला. दरम्यान, वैभवीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. वडिलांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता.

Supriya Sule, Vaibhavi Deshmukh
Vaibhavi Deshmukh HSC Result : संतोष देशमुखांच्या जिद्दी लेकीनं आपल्या ‘गुणां’नी महाराष्ट्राला जिंकलं! वैभवीचा बारावीचा निकाल जाहीर...

वडिलांना न्याय मिळावा, यासाठी वैभवीही झटत होती. या संघर्षाच्या काळातही तिचा इयत्ता बारावीचा अभ्यास सुरू होता. अतिशय जिद्दीने आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने परिस्थितीवर मात करत अभ्यास केला आणि चांगले यशही मिळवले. त्यामुळे वैभवीच्या यशाने महाराष्ट्रातील प्रत्येकाला आनंद झाला असावा, हे निश्चित.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com