MP Shrirang Barne : 'संसदरत्न' बारणे मंत्रिपदापासून वंचितच; उद्योगनगरीत नाराजी !

Maval Lok Sabha Election 2024 : पुणे जिल्ह्यातील अजित पवार यांच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी पुण्याचे भाजपचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना केंद्रात मंत्रीपद देण्यात आल्याची चर्चा आहे. भाजपचे राज्यातील चाणक्य देवेंद्र फडणवीस यांनी ही खेळी केल्याचे बोलले जात आहे.
Shrirang Barne
Shrirang BarneSarkarnama

Pimpri News : उद्योगनगरी अशी ओळख असलेले पिंपरी-चिंचवड हे राज्यात नाही,तर केंद्रांतही मंत्रीपदापासून वंचितच राहिले आहे. लोकसभेच्या निकालानंतर हा बॅकलॉग खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून भरून निघण्याची संधी होती.पण, ही संधी पश्चिम महाराष्ट्रातून पुण्याचे भाजप खासदार मुरलधीर मोहोळ यांना देण्यात आली. उद्योगनगरीवर प्रत्येकवेळी होत असलेल्या अन्यायामुळे पिंपरी-चिंचवडकरांमध्ये नाराजी पसरली आहे.

'एनडीए'तील शिवसेनेचे बुलडाण्याचे खासदार प्रताप जाधव यांच्यासह मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे मंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार होते. बारणे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात स्थान मिळेल अशी, अपेक्षा होती. मात्र शिवसेनेने आपल्या वाट्याला आलेले केंद्रीय राज्यमंत्रीपद जाधव यांना देण्याचा निर्णय घेतला. परिणामी मावळचे खासदार आणि पिंपरी-चिंचवडकर असलेल्या श्रीरंग बारणे यांची संधी हुकली.आणि उद्योगनगरी पुन्हा एकदा मंत्रीपदापासून वंचितच राहिली.

पिंपरी-चिंचवडला आतापर्यंत मंत्रीपदाने केंद्रातच नाही,तर राज्यातही अनेकदा नुसती हुलकावणी दिलेली आहे.गेल्या टर्मला राज्यात युती सरकारमध्ये ही संधी चालून आली होती. त्यासाठी सलग दोनदा विजयी झालेले भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे,तर आमदारकीची हॅटट्रिक केलेले चिंचवडचे लक्ष्मण जगताप प्रबळ दावेदार होते. पण, ती हुकली. 2014 च्या टर्ममध्येही हे दोघेच या शर्यतीत होते. पण,त्यावेळी भाजपने त्यांना डावलून शेजारच्या मावळचे आमदार बाळा ऊर्फ संजय भेगडे यांना राज्यमंत्री केले आणि उद्योगनगरी मंत्रीपदापासून वंचित राहिली.

Shrirang Barne
Sunil Shelke : आमदार सुनील शेळकेंनी सांगितली महायुतीची पराभवाची कारणे, 'मराठा आरक्षण, जातीधर्मावर...'

राज्यात हुकलेली मंत्रीपदाची संधी यावेळी केंद्रात चालून आली होती.कारण बारणे हे महायुतीकडून सलग तिसऱ्यांदा निवडून आले होते. त्यामुळे ज्येष्ठत्वाचा विचार करता ते प्रबळ दावेदार होते. मात्र, पहिल्यांदाच निवडून आलेल्या मोहोळांना हा बहूमान देण्यात आला.त्यामुळे तूर्त उद्योगनगरी पुन्हा मंत्रीपदापासून वंचित राहिली. विस्तारात त्यांना संधी मिळेल,असा त्यांच्या चाहत्यांचा दावा आहे.पण, तो खरा ठरेल,अशी चिन्हे दिसत नाहीत.

तरुण चेहरा आणि पक्षाचे खासदार म्हणून भाजपने मोहोळ यांना संधी दिली असल्याचे समजते. प्रत्यक्षात पुणे जिल्ह्यातील अजित पवार यांच्या वर्चस्वाला धक्का देण्याचा सुप्त हेतू त्यामागे आहे. ही चाल भाजपचे राज्यातील चाणक्य देवेंद्र फडणवीसांची असल्याची चर्चा आहे. तरुण हा निकष विचारात घेतला,तर खासदारकीची हॅटट्रिक केलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पूत्र आणि कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे हे सुद्धा मंत्री झाले असते. पण, घराणेशाहीचा शिक्का मुख्यमंत्री शिंदेवर बसला असता. त्यामुळे ज्येष्ठ सदस्य म्हणून सलग चौथ्यांदा विजयी झालेले जाधव यांना हा मान देण्याची खेळी शिंदेंनी केली.

Shrirang Barne
Sunil Shelke: माशी कुठं शिंकली? बारणेचं मताधिक्य का घटलं?; शेळके म्हणाले, 'दिवसा धनुष्यबाण अन् रात्री मशाल...'

बारणे मंत्री झाले असते, तर पिंपरी-चिंचवडचा मंत्रीपदाचा बॅकलॉग प्रथमच भरून निघाला असता. त्यांनी गत टर्मला लोकसभा अध्यक्षांच्या तालिकेवरही काम केले होते. सर्व पक्षांशी असलेले त्यांचे चांगले सबंध आणि अनुभव लक्षात घेता मंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार होते.ते मुख्यमंत्री शिंदे यांच्या मर्जीतील होते म्हणजे आहेत.त्यामुळे भाजपचा वरचष्मा आणि जास्त ताकद असूनही मावळात त्यांना शिंदेनी लोकसभेला पुन्हा संधी दिली होती. शिंदे त्यांच्या प्रचारालाही आले होते.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com