PCMC News : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकाऱ्यांना तीन लाखांचा बोनस, कर्मचाऱ्यांना 60 हजार; सगळ्यांची दिवाळी गोड!

PCMC Diwali Bonus : पिंपरी-चिंचवड महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे. यंदा ७० कोटी रुपयांचा बोनस व सानुग्रह अनुदान देण्यात आले.
PCMC News
PCMC NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

ज्ञानेश्वर भंडारे

PCMC News : पिंपरी-चिंचवड महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे. महापालिकेच्या सात हजार ६०० अधिकारी व कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळीनिमित्त सुमारे ७० कोटी रुपयांचा बोनस व सानुग्रह अनुदान देण्यात आले.

कर्मचाऱ्यांना किमान ६० हजारांपासून तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना कमाल तीन लाख रुपयांपर्यंत बोनस मिळाल्याने सर्वांची दिवाळी गोड झाली आहे. यंदा सानुग्रह अनुदानातही पाच हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

कामगार आयुक्तांच्या सूचनेनुसार महापालिका प्रशासन आणि पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघ यांच्यात दर पाच वर्षांनी करार केला जातो. त्यानुसार वर्ग एक ते वर्ग चारमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ८.३३ टक्के बोनस आणि सानुग्रह अनुदान दिले जाते. यापूर्वी २५ हजार रुपये असलेले सानुग्रह अनुदान यंदा ३० हजार रुपये करण्यात आले आहे.

महापालिकेने ६८ कोटी ९१ लाख रुपयांच्या बोनसचे वितरण केले आहे. अन्य संबंधित घटकांच्या अनुदानासह एकूण खर्च सुमारे ७० कोटी रुपये झाला आहे. अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, घंटागाडी कर्मचारी आणि सफाई कामगारांना ३० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाते. दरम्यान, महापालिका कर्मचाऱ्यांना शनिवार (ता. ७) ते बुधवार (ता. ११) अशी सलग पाच दिवस दिवाळीची सुट्टी मिळणार आहे.

PCMC News
PCMC: नगरसेवकांनो, निधी खर्च करताना नियम पाळा! विकासकामांवर महापालिकेचे कडक निर्बंध

उबाळे यांनी बोनस नाकारला

महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे यांनी यंदा बोनस स्वीकारलेला नाही. "यापूर्वी ज्या महापालिकांमध्ये कार्यरत होतो, तेथेही मी बोनस घेतला नव्हता," असे त्यांनी सांगितले. यापूर्वीचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजेश लांडे यांनीही बोनस घेतला नव्हता.

आणखी कोणाला लाभ ?

सहा महिन्यांपासून कार्यरत अधिकारी-कर्मचारी, बालवाडी शिक्षिका, प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक व कर्मचारी, मानधनावरील अधिकारी-कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी, समूह संघटक आणि तासिका तत्त्वावरील कर्मचाऱ्यांनाही बोनस दिला जातो. निलंबित अधिकारी-कर्मचारी तसेच गेल्या वर्षात सेवानिवृत्त झालेल्यांचाही यात समावेश आहे. पीएमपी कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी महापालिकेने आपल्या हिश्श्याची ४० टक्के रक्कम दिली आहे.

PCMC News
BJP Leader : सांगोल्यात भाजप युवा मोर्चाच्या माजी तालुकाध्यक्षाचा गोळ्या झाडून खून; एकनाथ शिंदेंच्या नेत्यावर सुपारी दिल्याचा आरोप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.