
निगडी ते चाकण असा नवीन मेट्रो मार्ग उभारण्याची प्रक्रिया गती घेऊ लागली आहे. पिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रोचा विस्तार सुरू असतानाच आता भक्ती-शक्ती चौकातून थेट चाकणपर्यंत मेट्रो नेण्याचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) महामेट्रो प्रशासनाने पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे सुपूर्त केला आहे.
हा आराखडा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झाल्यानंतर तो राज्य सरकारकडे, त्यानंतर केंद्र सरकारकडे पाठविला जाणार असून मंजुरी मिळाल्यावर प्रत्यक्ष काम सुरू होईल. या संपूर्ण प्रक्रियेस किमान एक ते दीड वर्ष लागणार आहे.
नवीन मेट्रो मार्ग सुमारे 35 ते 40 किलोमीटर लांबीचा प्रस्तावित असून, तो शहराच्या दक्षिण भागासह भोसरी परिसराशी जोडला जाईल. वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव या उच्वभ्रू व आयटी परिसराला थेट मेट्रो कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. या मार्गावर मुकाई चौक, रावेत, निगडी भक्ती-शक्ती चौक, मोशी, नाशिक फाटा, भोसरी, पुनावळे, ताथवडे, भुमकर चौक, वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव अशी महत्त्वाची स्थानके असतील.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मान्यता मिळाल्यानंतर आराखडा राज्य सरकारकडे पाठवला जाणार असून, त्यानंतर केंद्र सरकारकडून मान्यता घेतली जाईल. संपूर्ण प्रक्रियेस किमान एक ते दीड वर्ष लागण्याची शक्यता आहे. मान्यता मिळाल्यावर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी माहिती महामेट्रोचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनावणे यांनी दिली.
या मार्गावरील प्रस्तावित महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये मुकाई चौक, रावेत, निगडी भक्ती-शक्ती चौक, मोशी, नाशिक फाटा, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, भोसरी, वाकड, भुमकर चौक, ताथवडे व पुनावळे यांचा समावेश आहे. यात नाशिक फाटा हे महत्त्वाचे जंक्शन ठरणार असून येथून भोसरी, चाकण, दापोडी ते निगडी मार्ग तसेच पुणे शहरात सहज प्रवास करता येईल. त्याचप्रमाणे, भक्ती-शक्ती समूह शिल्प मेट्रो स्टेशनवरून रावेत, वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, भोसरी व चाकणकडे थेट कनेक्टिव्हिटी मिळेल.
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सध्या ३० लाखांहून अधिक असून ती झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत चालली आहे. भक्ती-शक्ती चौक ते चाकण हा मार्ग औद्योगिक, शैक्षणिक आणि निवासी दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या मेट्रो विस्तारामुळे दैनंदिन वाहतूक कोंडी कमी होऊन सार्वजनिक वाहतूक सक्षम होईल, तसेच परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल.
प्रकल्प मार्गी लागल्यास पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे 75 टक्के भाग मेट्रो नेटवर्कशी जोडला जाईल. यामुळे प्रवासाचा वेळ आणि खर्च दोन्ही कमी होऊन नागरिकांना आधुनिक, जलद व पर्यावरणपूरक वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.