PDDC Bank Election : जिल्हा बँकेच्या एका-एका मतासाठी ‘अपहरण’? माजी सभापतीसह सहा जणांवर गुन्हा

PDDC Bank Election : Two Allegedly Abducted FIR Khed Police : पीडीसीसी निवडणुकीपूर्वी मतदार प्रतिनिधी निवडीवरून खेड तालुक्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. दोन जणांचे अपहण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा देखील झाला आहे.
Pune District Bank Election Dispute Kidnapping Case
Pune District Bank Election Dispute Kidnapping CaseSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) आगामी निवडणुकीपूर्वी मतदार प्रतिनिधी निवडीवरून खेड तालुक्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. बहुमताची जुळवाजुळव करण्याच्या या राजकीय खेळाला आता गंभीर वळण मिळाले असून, सोसायटी संचालक आणि एका महिलेचे अपहरण झाल्याच्या दोन तक्रारी खेड पोलिस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. या दोन्ही प्रकरणांत माजी पंचायत समिती सभापतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

कान्हेवाडी बुद्रुक येथील शिवकृपा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे संचालक रामदास महादू निमसे (वय ६०) यांचे अपहरण झाल्याची तक्रार त्यांचे पुत्र राहुल निमसे यांनी केली आहे. तक्रारीनुसार, रविवारी (६ सप्टेंबर) सकाळी बाजीराव नथू कोबल, ज्ञानेश्वर गंगाराम कोबल आणि धोंडिभाऊ गेनुभाऊ सहाने यांनी बैठकीसाठी निमसे यांना बोलावून घेतले. त्यानंतर ते घरी परतले नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी बुधवारी (९ सप्टेंबर) मध्यरात्रीच्या सुमारास खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसऱ्या घटनेने या प्रकरणाला आणखी राजकीय रंग चढला आहे. आंबोली येथील पुष्पा दत्तात्रय शिंदे (वय ४७) यांचे अपहरण झाल्याची तक्रार त्यांचे नातेवाईक अतुल दत्तात्रय शिंदे (वय २७) यांनी केली आहे. याप्रकरणी खेड पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश लक्ष्मण शिंदे, लक्ष्मण धोंडू शिंदे आणि मंगल लक्ष्मण शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune District Bank Election Dispute Kidnapping Case
Amravati District Bank : अमरावती जिल्हा बँकेवर प्रशासक येणार? संचालक मंडळाची न्यायालयात धाव

तक्रारीनुसार, ५ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास तिघेही पुष्पा शिंदे यांच्या घरी आले. पीडीसीसीच्या प्रतिनिधी निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी त्यांना खेड येथे घेऊन जाण्याचे सांगण्यात आले. त्यानंतर एमएच १४ एचके ६६०६ क्रमांकाच्या क्रेटा कारमधून पुष्पा शिंदे यांना घेऊन ते निघून गेले. मात्र, त्या रात्रीपर्यंत घरी परतल्या नाहीत. संबंधित व्यक्तींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे मोबाईल बंद असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, स्थानिक पातळीवर चौकशी केली असता संबंधितांच्या कुटुंबीयांकडून ‘ते घरी येतील, काळजी करू नका’, असे सांगण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मात्र, तीन दिवस उलटूनही पुष्पा शिंदे घरी न परतल्याने अखेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

पीडीसीसीच्या निवडणुकीपूर्वीच प्रतिनिधी निवडीसाठी गावोगावी सुरू असलेल्या राजकीय मोर्चेबांधणीला या घटनांमुळे वेगळेच वळण मिळाले आहे. खेड तालुक्यात तब्बल १०४ सहकारी संस्थांमधील संचालक मंडळातून जिल्हा बँकेसाठी मतदार प्रतिनिधी निवडण्याची प्रक्रिया सुरू आहे. २२ सप्टेंबरपर्यंत प्रतिनिधी निवडीचे ठराव संमत होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक सोसायटीतील एक-एक मतदार प्रतिनिधी आपल्या बाजूला खेचण्यासाठी राजकीय गटांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

मतांसाठी राजकीय संघर्ष

या पार्श्वभूमीवर दोन व्यक्तींच्या अपहरणाच्या तक्रारी समोर आल्याने ‘मतांसाठीचा सहकारातील संघर्ष नेमका कुठपर्यंत जाणार?’ असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पोलिसांनी दोन्ही प्रकरणांत गुन्हे दाखल केले असून, संबंधित व्यक्तींचा शोध आणि पुढील तपास सुरू आहे. आरोप सिद्ध झालेले नसून, पोलिस तपासानंतरच या घटनांमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

Pune District Bank Election Dispute Kidnapping Case
PDCC Bank : पुणे जिल्हा बँक निवडणुकीत राजकीय खेळ सुरू; ‘आपला माणूस’ बसवण्यासाठी सोसायट्यांमध्ये रस्सीखेच!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com