Pune News : शास्त्रज्ञ प्राध्यापकाकडून सुरू असलेल्या छळाचा आणि त्याच्याकडून होणाऱ्या गैरवर्तनाला कंटाळून पीएचडीच्या विद्यार्थीनिने टोकाचे पाऊल उचलले. गळफास घेत तिने आपले जीव संपवले. ही धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमधील शाहूनगर येथे घडली.
आरोपी बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियामधील साहायक संचालक डाॅ.ए बिन्नीयामीन (वय.50) याला अटक केली आहे. न्यायालायाने त्याला 15 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
संशयित आरोपी डाॅ.ए बिन्नीयामीन हा विद्यार्थिनीचा पीचडीचा मार्गदर्शक होता. आत्महत्येपूर्वी विद्यार्थिनीने लिहिल्या चिठ्ठीत गंभीर आरोप केले आहे. प्राध्यापक डाॅ.ए बिन्नीयामीन हा ऑगस्ट 2025 पासून गैरवर्तन आणि मानसिक छळ करत होता. या त्रासाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलले.
दोन दिवसांपूर्वी बिन्नीयामीन याने स्टॅम्प पेपरवर माफीपत्र दिले होते. त्यात पुन्हा असा प्रकार करणार नसल्याचे म्हटले होते. मात्र, विद्यार्थिनी मानसिक धक्क्यातून सावरू शकली नाही. विद्यार्थीनीचे आई वडील गावी गेले होते. तेव्हा मित्राला फोन करत आपण आत्महत्या करत असल्याचे तिने सांगितले.
विद्यार्थीनीचे आई-वडील शनिवारी गावी गेले होते. ती घरी एकटीच होती. प्राध्यापकाकडून होणाऱ्या गैरवर्तनामुळे ती मानसिक धक्क्यात होती. तिने मित्राला फोन करत आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले. मित्राने फोनवर बोलत तिला समजवण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या घराकडे धाव घेतली. मात्र, तो घरी पोहोचण्यापूर्वीच तिने गळफास घेतला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.