Sharad Pawar vs BJP : "भाजपचं हिंदुत्व म्हणजे खरातचं..."; शरद पवारांना निधर्मी म्हणणाऱ्या फडणवीसांवर ठाकरेंच्या खासदाराची बोचरी टीका

Sharad Pawar on Warkari Sampraday : "पवारसाहेबांचं महाराष्ट्राच्या विकासात योगदान असलं तरीही त्यांचा वारकरी संप्रदायाशी फार संबंध राहिलेला नाही. त्यांनी स्वतःही अनेक वेळा कबूल केले आहे की ते निधर्मी आहेत धर्म मानत नाहीत. त्यांचा सगळा पिंड निधर्मी आहे. त्यांचा जो काही लेख आहे तो अत्यंत चुकीचा आहे."
Devendra Fadanvis & Sharad Pawar
Sharad Pawar addressing media amid controversy over Warkari Sampraday remarks, highlighting the ongoing political debate in Maharashtra.Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 13 Apr : जेष्ठ नेते तथा राज्यसभा खासदार शरद पवार यांनी एका लेखात, वारकरी संप्रदायासारख्या समतेच्या चळवळीत प्रतिगामी लोक घुसखोरी करू लागले आहेत. वारकरी संप्रदायात 60 टक्के लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी असून दुर्दैवाने या प्रबोधनाच्या मार्गावर कुठे महिला नाहीत", अशी खंत व्यक्त केली आहे.

त्यांच्या या लेखावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजपच्या नेत्यांनी शरद पवारांवर सडकून टीका करायला सुरूवात केली आहे. तर खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शरद पवार हे निधर्मी असल्याची बोचरी टीका केली आहे.

पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, "पवारसाहेबांचं महाराष्ट्राच्या विकासात योगदान असलं तरीही त्यांचा वारकरी संप्रदायाशी फार संबंध राहिलेला नाही. त्यांनी स्वतःही अनेक वेळा कबूल केले आहे की ते निधर्मी आहेत धर्म मानत नाहीत. त्यांचा सगळा पिंड निधर्मी आहे. त्यांचा जो काही लेख आहे तो अत्यंत चुकीचा आहे. आणि मला दु:ख आहे की त्यांनी अशा प्रकारचा लेख लिहिला.", असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Devendra Fadanvis & Sharad Pawar
Pimpri Chinchwad politics : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात ठिणगी! पराभवानंतर नेत्यांमध्ये जुंपली; योगेश बहलांचा स्थानिक आमदारांवर थेट निशाणा!

दरम्यान, फडणवीसांच्या याच वक्तव्यावर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. या देशात आणि जगाच फक्त देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या लोकांचाच हिंदुत्वाशी संबंध आहे बाकी सगळे लोक बाहेरच्या देशात जन्माला आले आहेत.

Devendra Fadanvis & Sharad Pawar
congress crisis : सिद्धरामय्यांची खुर्ची धोक्यात? कर्नाटकात मोठा राजकीय भूकंप? काँग्रेसचे ३० आमदार बंडाच्या तयारीत

फक्त भाजपचे लोकच हिंदुस्थानात हिंदु म्हणून जन्माला आले असं त्यांना म्हणायचं आहे. पण ते जे हिंदुत्व मानतायत ते हिंदुत्व नाही. त्यांचं हिंदुत्व खरातचं हिंदुत्व आहे. भाजपचं हिंदुत्व खरातचं असून तो जो अजून बुवा पकडला आहे एरंडे हे त्यांचं हिंदुत्व आहे जे आम्ही कधीच स्विकारणार नाही, अशा शब्दात राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com