

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट सामना रंगत आहे. काही माजी नगरसेवक विविध पक्षांतून, तर काही अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपचे अनेक माजी; आणि भाजपने तिकीट नाकारलेले काही माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. त्यामुळे काही लढती अधिकच चुरशीच्या होण्याची चर्चा आहे.
शहरातील 128 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, मनसे, आप, वंचित यांसह अन्य पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत. २०१७ च्या निवडणुकीत विजयी झालेल्या काही माजी नगरसेवकांनी पुन्हा ताकद पणाला लावली आहे. या सगळ्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या कोणकोणत्या प्रभागांमध्ये हायव्होल्टेज लढती होत आहेत, हेच पाहू...
प्रभाग 2 : भाजपचे वसंत बोराटे व अश्विनी जाधव आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक रिंगणात
प्रभाग 5 : राष्ट्रवादीतून संधी न मिळाल्याने माजी नगरसेवक अनुराधा गोफणे व जालिंदर शिंदे आता भाजपचे; तर भीमाबाई फुगे आणि प्रियांका बारसे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार.
प्रभाग 8 : भाजपच्या माजी नगरसेवक सीमा सावळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार
प्रभाग 11 : भाजपमधून आलेल्या आश्विनी बोबडे यांचे पती भीमा बोबडे शिवसेनेचे उमेदवार
प्रभाग 12 : राष्ट्रवादीचे प्रवीण भालेकर भाजपकडून रणांगणात
प्रभाग 14 : शिवसेनेतून आलेल्या मीनल यादव यांना भाजपकडून संधी
प्रभाग 15 : शिवसेना सोडून आलेले अमित गावडे हे भाजपकडून मैदानात, तर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले राजू मिसाळ रिंगणात
प्रभाग 18 : राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या अपर्णा डोके यांना संधी, शिवसेनेला जय महाराष्ट्र करत अश्विनी चिंचवडे राष्ट्रवादीच्या उमेदवार
प्रभाग 21 : भाजपकडून इच्छुक असलेले संदीप वाघेरे हे आता राष्ट्रवादीकडून उमेदवार. तर, राष्ट्रवादीत असलेल्या उषा वाघेरे या भाजपकडून मैदानात
प्रभाग 22 : अपक्ष नीता पाडाळे आणि राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक विनोद नढे हे भाजपकडून मैदानात
प्रभाग 24 : भाजपमधून आलेल्या माया बारणे या आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार
प्रभाग 25 : शिवसेनेचे माजी नगरसेवक असलेले राहुल कलाटे हे यावेळी भाजपकडून रणांगणात
प्रभाग 26 : भाजपचे माजी नगरसेवक तुषार कामठे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मैदानात
प्रभाग 31 : अपक्ष माजी नगरसेवक नवनाथ जगताप यांना यावेळी भाजपकडून संधी
उषा ढोरे, शकुंतला धराडे, नितीन काळजे, राहुल जाधव, नितीन लांडगे, विलास मडिगेरी, हिराबाई घुले, रवि लांडगे (बिनविरोध), संतोष लोंढे, सोनाली गव्हाणे, नम्रता लोंढे, अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे (बिनविरोध), तुषार हिंगे, कुंदन गायकवाड, योगिता नागरगोजे, शांताराम भालेकर, विनोद नढे, उत्तम केंदळे, शैलजा मोरे, शर्मिला बाबर, संगीता भोंडवे, नामदेव ढाके, सचिन चिंचवडे, मोरेश्वर शेंडगे, सुरेश भोईर, शीतल शिंदे, जयश्री गावडे, सुजाता पालांडे, मनीषा पवार, स्व. अर्चना बारणे पती तानाजी बारणे, अभिषेक बारणे, ममता गायकवाड यांचे पती विनय गायकवाड, राहुल कलाटे, आरती चोंधे.
संदीप कस्पटे, बाबासाहेब त्रिभुवन, सविता खुळे, चंद्रकांत नखाते, शत्रुघ्न काटे, सारिका बोऱ्हाडे, सागर आंघोळकर यांच्या पत्नी रविना, शशिकांत कदम, प्रशांत शितोळे, हर्षल ढोरे, राजू मिसाळ, झामाबाई बारणे यांचे पुत्र सिद्धेश्वर बारणे, अपर्णा डोके, प्रकाश बाबर यांची सून ऐश्वर्या बाबर, नीता पाडाळे, नवनाथ जगताप, कैलास बारणे बंधू प्रवीण बारणे, शांताराम भालेकर, संजय उर्फ नाना काटे, चंद्रकांता सोनकांबळे, उषा मुंडे, शोभा आदियाल यांची सून दुर्गाकौर आदियाल, सुरेश नढे यांचे चिरंजीव हर्षद नढे, सद्गुरू कदम, मंगला कदम यांचे चिरंजीव कुशाग्र कदम, समीर मासुळकर यांच्या पत्नी शीतल मासुळकर.
योगेश बहल, श्याम लांडे यांच्या पत्नी मनीषा लांडे, जितेंद्र ननावरे, वैशाली घोडेकर, राहुल भोसले, भाऊसाहेब भोईर, नाना काटे, शीतल काटे, राजेंद्र जगताप, पंकज भालेकर, वैशाली काळभोर, मोरेश्वर भोंडवे, नारायण बहिरवाडे, निकिता कदम, हिरानंद आसवानी, संदीप वाघेरे, मच्छिंद्र तापकीर, संतोष कोकणे, माया बारणे, मयुर कलाटे, रेखा दर्शिले, रोहित काटे, स्वाती काटे, राजू बनसोडे, अतुल शितोळे, वसंत बोराटे,
अश्विनी जाधव, प्रमोद कुटे, करुणा चिंचवडे यांचे पती शेखर चिंचवडे, काळुराम पवार, कोमल मेवानी पती दीपक मेवानी, सविता आसवानी, राजू लोखंडे, ॲड. सचिन भोसले यांच्या पत्नी ॲड. वर्षा भोसले, अश्विनी वाघमारे यांचे पती विक्रम वाघमारे, कैलास थोपटे यांच्या पत्नी अनिता थापटे, नागेश आगज्ञान यांची सून पूजा आगज्ञान, अनंत कोऱ्हाळे, अश्विनी चिंचवडे, तानाजी वाल्हेकर यांच्या पत्नी शोभा वाल्हेकर, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे चिरंजीव सिद्धार्थ बनसोडे, माजी नगरसेवक विश्वनाथ लांडे यांचे चिरंजीव विराज लांडे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लढत असलेले माजी नगरसेवक : तुषार कामठे, सुलक्षणा शीलवंत.
मनसेकडून लढत असलेले माजी नगरसेवक : सचिन चिखले, अश्विनी चिखले, शशिकिरण गवळी
अपक्ष लढत असलेले माजी नगरसेवक किंवा त्यांचे कुटुंबीय ॲड. सचिन भोसले, शारदा सोनवणे, राजेंद्र गावडे, प्रमोद ताम्हणकर, विलास नांदगुडे यांचे पुत्र शंतनू नांदगुडे, शैलेंद्र मोरे यांच्या पत्नी कविता मोरे
शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून लढत असलेले माजी नगरसेवक : विश्वास गजरमल, संगीता पवार
शिवसेनेकडून लढणारे माजी नगरसेवक किंवा त्यांचे कुटुंबीय नीलेश बारणे, सुलभा उबाळे, शुभांगी बोऱ्हाडे, अश्विनी बोबडे यांचे पती भीमा बोबडे, संध्या गायकवाड, किरण मोटे, मारुती भापकर, बाळासाहेब ओव्हाळ, वैशाली जवळकर, संध्या गायकवाड, संपत पवार यांचे पुत्र मयुर पवार.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.