PCMC BJP Politics : भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर! शहराध्यक्ष पदासाठी तीन गट आमने-सामने

BJP’s Internal Power Struggle in Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड शहरावरील राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व 2017 च्या महापालिका निवडणुकीमध्ये भाजपने मोडीत काढले. तत्कालीन शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली भाजपने महापालिका निवडणूक जिंकली होती.
BJP Politics
BJP PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसचा गड असलेल्या पिंपरी चिंचवड मध्ये गेल्या एक दशकापासून भाजपची सत्ता आहे. एकीकडे अजित पवार यांच्या पक्षाकडून पिंपरी चिंचवड शहराचा ताबा आपल्याकडे घेण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. सध्या पिंपरी चिंचवड शहर भाजप तीन गटांमध्ये विभागला गेला असून आपल्या गटाचा शहराध्यक्ष व्हावा, यासाठी मोर्चेबांधणी करण्यात येत असल्याचं समोर आले आहे.

पिंपरी चिंचवड शहरावरील राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व 2017 च्या महापालिका निवडणुकीमध्ये भाजपने मोडीत काढले. तत्कालीन शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली भाजपने महापालिका निवडणूक जिंकली होती. यासाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचा देखील हातभार होता. शहरातील प्रतिस्पर्धी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पुन्हा शहर ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

BJP Politics
Cabinet Meeting : मंत्रिमंडळाचा धडाकेबाज निर्णय; नगराध्यक्षांना बहुमताने हटवणार

आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अजित पवार यांच्या आव्हानाला परतवून लावणारा शहराध्यक्ष नियुक्त करण्यासाठी भाजपमध्ये जोरदार हालचाली सुरू आहेत. यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारच शहराध्यक्ष असावा, असं धोरण ठरवलं होतं. त्यामुळे सुरुवातीला लक्ष्मण जगताप आणि नंतर भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याकडे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी होती.

लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर जानेवारी 2023 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत उमेदवारी कोणाला द्यायची यावरून जगताप कुटुंबामध्ये अंतर्गत कलह पाहायला मिळाला. अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिल्यानंतर शंकर जगताप यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना शहराध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. मात्र 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत शंकर जगताप आमदार झाले.

BJP Politics
Maharashtra Politics : 'मविआ'ला डावलून महायुतीविरोधात 'हे' तीन बडे नेते रान पेटवणार; 'स्थानिक'च्या निवडणुकीपूर्वी नवे राजकीय समीकरण जुळणार!

निवडणुकीदरम्यान भाजपाचा एक गट नाराज असल्याने या गटाला निवडणूक प्रक्रियेमध्ये सक्रिय करण्याच्या दृष्टिकोनातून शत्रुघ्न काटे यांना कार्यकारी अध्यक्षपद देण्यात आले. आता पुन्हा शहराध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया भाजपने सुरू केली आहे. ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शहर भाजपमध्ये नवीन शहराध्यक्ष निवडीवरून तीन गट निर्माण आहेत.

एक गट विद्यमान शहराध्यक्ष शंकर जगताप त्यांनाच शहराध्यक्ष पदावर कायम ठेवावं, यासाठी आग्रही आहे. तर दुसरा गट कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्याकडे पूर्ण वेळ शहराध्यक्षपद कारभार देण्याची मागणी करत आहे. तसेच तिसरा गट पक्ष संघटनेतील अनुभवी, निष्ठावान कार्यकर्त्यालाच शहराध्यक्षपद अशा पवित्र्यात आहे. त्यातूनच दोन शहराध्यक्ष निवडण्याची संकल्पना पुढे आली होती. मात्र त्या चर्चांना आता विराम मिळाला आहे.

शहराध्यक्ष निवडीवरून पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये अंतर्गत कलहाबाबत मोठ्या प्रमाणात राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या पद्धतीने काँग्रेसमधील गटबाजीमुळे पक्षाला नुकसान सहन करावे लागते, त्याच पद्धतीने ही गटबाजी वेळेत न रोखल्यास आगामी महापालिका निवडणुकीत याचा फटका भाजपला बसू शकतो, असेदेखील बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com