MLC Election : सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष! पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची 'पॉवर' वाढणार? विधान परिषदेसाठी 'या' दोन नेत्यांमध्ये प्रतिष्ठेची 'रस्सीखेच'!

Maharashtra MLC Election News : राष्ट्रवादी काँग्रेस केवळ एका आमदारावर आहे. हा राजकीय बॅकलॉग भरून काढण्यासाठी आता विधान परिषदेच्या रिक्त जागेवर पिंपरी-चिंचवडच्या नेत्याची वर्णी लागण्याचे संकेत मिळत आहेत.
Sunetra Pawar
Sunetra Pawar interacts with NCP leaders during candidate discussions for the Maharashtra MLC election, highlighting her key decision-making role.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे. शहरात सध्या भाजपचे शहरात दोन विधानसभा, दोन विधान परिषद असे चार आमदार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस केवळ एका आमदारावर आहे. हा राजकीय बॅकलॉग भरून काढण्यासाठी आता विधान परिषदेच्या रिक्त जागेवर पिंपरी-चिंचवडच्या नेत्याची वर्णी लागण्याचे संकेत मिळत आहेत.

भाजपच्या वर्चस्वाला शह देण्याची रणनीती

शहरात भाजपचे (BJP) आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य फुंकण्यासाठी विधान परिषदेची ही जागा कळीची ठरणार आहे. विशेषतः भोसरी आणि चिंचवड पट्ट्यात पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी पक्षश्रेष्ठी या जागेचा वापर 'बुस्टर डोस' म्हणून करण्याची शक्यता आहे.

Sunetra Pawar
Maharashtra Politics Update : दिवसभरात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

विधान परिषदेच्या एका जागेसाठी पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीतून (NCP) सध्या चार नावांची जोरदार चर्चा आहे. यामध्ये विलास लांडे जे भोसरीचे प्रथम आमदार आणि ज्येष्ठ नेते असून त्यांचा दांडगा जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे. त्यामुळे लांडे यांची वर्णी लागणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sunetra Pawar
Sanjay Jadhav : उद्धव ठाकरेंचा परभणीचा 'वाघ'; शिंदेच्या ऑपरेशन 'टायगर'मध्ये अडकणार का?

दुसरीकडे योगेश बहल राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष असून महापालिकेच्या राजकारणातील मोठा अनुभव आणि पक्ष संघटनेवरील पकड असलेले ते नेते आहेत. त्यासोबतच भोसरी विधानसभेसाठी दंड थोपटलेले आक्रमक नेतृत्व आणि माजी नगरसेवक अजित गव्हाणे आणि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपला कडवी झुंज देणारे नेते नाना काटे यांचे देखील नाव चर्चेत आहे.

Sunetra Pawar
Baramati By-Election: काय होईल बारामतीत? महाराष्ट्रातील राजकीय आघाड्यांचे पोपट मेले आहेत...

खरी रस्सीखेच 'या' नेत्यांमध्ये

समोर आलेल्या माहितीनुसार, सध्या खरी लढत विलास लांडे आणि योगेश बहल यांच्यात असल्याचे समजते. काहींचा लांडे यांच्या अनुभवाचा फायदा शहराला मिळावा असा एक सूर आहे, तर दुसरीकडे शहराध्यक्ष म्हणून बहल यांनी केलेल्या कामाची पावती त्यांना मिळावी, अशी समर्थकांची मागणी आहे. त्यामुळे शहराचा राजकीय समतोल राखण्यासाठी आणि आगामी निवडणुकीत भाजपला अंगावर घेण्यासाठी पक्ष कोणाच्या गळ्यात आमदारकीची माळ टाकतो? याकडे आता अवघ्या पिंपरी-चिंचवडचे लक्ष लागले आहे.

Sunetra Pawar
Operation Lotus : महाराष्ट्राच्या राजकारणात आठ दिवसांत मोठा भूकंप होणार! काँग्रेसच्या बड्या नेत्याचे खळबळजनक भाकीत, आता कोणता पक्ष फुटणार ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com