Pimpri Chinchwad News : पिंपरी-पालिकेच्या बजेटमध्ये तीनही आमदारांना झुकते माप; कुणाच्या पारड्यात किती?

Pimpri Chinchwad News : अर्थसंकल्पावर महापालिकेतील सत्ताधारी पक्षाची छाप असल्याचा प्रश्नच उद्भवला नाही.
Pimpri Chinchwad News
Pimpri Chinchwad NewsSarkarnama

Pimpri Chinchwad News : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे 2024-25 या आर्थिक वर्षाचे बजेट मंगळवारी (ता.२०) सादर झाले. महापालिकेत दोन वर्षापासून प्रशासकीय राजवट असल्याने या अर्थसंकल्पावर महापालिकेतील सत्ताधारी पक्षाची छाप असल्याचा प्रश्नच उद्भवला नाही. त्यात गतवेळी शहरातील तीनपैकी सत्ताधारी भाजपच्या दोन आमदारांच्या मतदारसंघांना झुकते माप होते. यावेळी ते तिन्ही मतदारसंघांना मिळाले आहे,हे विशेष. (Latest Marathi News)

Pimpri Chinchwad News
NCP Breaking News : शरद पवारांना मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला 'हे' महत्त्वाचे आदेश

उद्योगनगरीत पिंपरी, चिंचवड आणि भोसरी असे तीन विधानसभा मतदारसंघ असून तेथे अनुक्रमे अण्णा बनसोडे,अश्विनी जगताप आणि महेश लांडगे आमदार आहेत. बनसोडे हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार समर्थक), तर जगताप आणि लांडगे हे भाजपचे आमदार आहेत. गत वर्षाचे बजेट आले तेव्हा राज्यात शिवसेना-भाजपची सत्ता होती. त्यामुळे त्या महापालिका बजेटममध्ये भोसरी आणि चिंचवडला विकासकामे व त्यांच्या तरतुदीसाठी निधी देताना झुकते माप मिळाले होते.

दरम्यान, गेल्यावर्षी राष्ट्रवादी राज्यातील सत्तेत सहभागी झाल्याने यावर्षीच्या बजेटमध्ये त्यांच्या आमदारांचीही (बनसोडे) लॉटरी लागली. त्यांच्या मतदारसंघातील महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांसाठी भरीव निधी देण्यात आला आहे.तर,शिवसेनेचा आमदारच शहरात नसल्याने त्यांच्याबाबतीत हा प्रश्नच निर्माण होत नाही.

Pimpri Chinchwad News
Maratha Reservation News : मराठा आंदोलकांनी अडविला मुंबई-आग्रा महामार्ग

लोकसभा निवडणूक (Lok Sabha) एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता आहे.त्यावेळी पिंपरी महापालिकेच्या 5842 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये विकासकामांसाठी देण्यात आलेल्या 1863 कोटी रुपयांचे भांडवल राज्यातील सत्ताधारी युतीचे शहरातील तिन्ही आमदार करण्याची दाट शक्यता आहे. त्यातही मतदारसंख्येचा विचार करता राज्यात दोन नंबरवर असलेल्या उद्योगनगरीतील चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी महापालिका बजेटमध्ये भोसरी व पिंपरीपेक्षा अधिक तरतूद करण्यात आली आहे.शहरात आठ क्षेत्रीय कार्यालये आहेत.त्यातील चिंचवड मतदारसंघातील कार्यालयांसाठी भोसरी व पिंपरीपेक्षा भरीव निधी देण्यात आला आहे.

शेखरसिंहाचे हे दुसरे बजेट होते. महापालिकेचे (PCMC) आयुक्त म्हणून काम करण्याची त्यांची ही पहिलीच वेळ आहे. त्यात त्यांना प्रशासक म्हणूनच काम पहावे लागले आहे. प्रशासकीय राजवटीतले पहिले बजेट गतवेळी त्यांना महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे यांनी सादर केले होते. राज्यात सत्तापालट झाला अन इकडे कोळंबेचीही बदली झाली. त्यामुळे यावेळी महापालिकेचे नवे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी ते प्रशासकांना सादर केले.त्यांना त्याच्या तयारीला पुरेसा वेळ न मिळाल्याने त्यात नाविन्याचा अभाव दिसून आला. परिणामी प्रशासनाचा ठसा त्यावर दिसून येत नाही.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com