Pune Crime : पुण्यात 'PSI'ला 46 लाख घेताना उचललं, ACB ला घरात सापडलं घबाड; पैसे अन् सोनं मोजताना अधिकारी घामाघूम

Pimpri Chinchwad PSI Bribery Case : मागील काही दिवसांपासून राज्यातील सरकारी अधिकाऱ्यांची आणि पोलिसांची भ्रष्टाचाराची प्रकरण उघडकीस येत आहेत. अशातच आता पिंपरी-चिंचवडमधील एका पोलीस उपनिरीक्षकाला तब्बल 46 लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडलं आहे.
Pimpri Chinchwad PSI Bribery Case
Pimpri Chinchwad PSI Bribery CaseSarkarnama
Published on
Updated on

Pimpri Chinchwad News, 04 Nov : मागील काही दिवसांपासून राज्यातील सरकारी अधिकाऱ्यांची आणि पोलिसांची भ्रष्टाचाराची प्रकरण उघडकीस येत आहेत. अशातच आता पिंपरी-चिंचवडमधील एका पोलीस उपनिरीक्षकाला तब्बल 46 लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडलं आहे.

या कारवाईमुळे पिंपरी-चिंचवड पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. तर लाच घेताना अटक केलेल्या उपनिरीक्षक प्रमोद रवींद्र चिंतामणी याला सोमवारी शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयाने त्याला 5 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, ‘एसीबी’च्या पथकाने आरोपी चिंतामणी याच्या भोसरीतील दिघी रस्त्यावरील सोपान रेसिडेन्सीमधील घर आणि कार्यालयाची झडती घेतली. असता या झाडाझडतीमध्ये तब्बल 51 लाखांची रोकड, सोन्याचे दागिने आणि मालमत्तेची कागदपत्रे जप्त केली आहेत. आरोपीच्या घरातील ही रोकड मोजण्यासाठी ‘एसीबी’च्या पोलिस अधिकाऱ्यांना मशिनचा वापर करावा लागला. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Pimpri Chinchwad PSI Bribery Case
Maharashtra Politics : एकनाथ खडसेंनी अचूक टायमिंग साधलं, शिंदेंच्या आमदाराच्या 'त्या' वक्तव्याचं समर्थन करत थेट CM फडणवीसांवर हल्लाबोल

नेमकं प्रकरण काय?

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या प्रमोद चिंतामणी याने एका आरोपीला गुन्ह्यात मदत करण्यासा तब्बल दोन कोटींची मागणी केली होती. यावेळी त्यांनी स्वत:साठी एक कोटी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसाठी एक कोटी मागितले होते.

Pimpri Chinchwad PSI Bribery Case
Prashant Padole : 'शेतकऱ्यांना 1 लाख दिले नाही तर यावेळी आम्ही आत्महत्या करणार नाही तुम्हाला उडवून देऊ...'; काँग्रेस खासदाराची थेट मोदी-फडणवीसांना धमकी

त्यामुळे आता त्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची देखील एसीबीकडून चौकशी केली जाणार आहे. मात्र, या प्रकरणामुळे पुन्हा एकदा पोलीस खात्यातील भ्रष्टाचाराचा मुद्दा चर्चेत आला असून अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना कोणाचाच धाक उरला नाही का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com