Pimpri Chinchwad : पिंपरी पालिकेचा तुघलकी कारभार : सोसायटीत एकाने कर नाही भरला, तर सर्वांचेच पाणी बंद!

Pimpri Chinchwad : पूर्ण सोसायटीचा पाणीपुरवठा कसा तोडला जावू शकतो?
Pimpri Chinchwad Shekhar Singh
Pimpri Chinchwad Shekhar SinghSarkarnama

Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड शहरात जे थकीत मालमत्ता करधारक आहेत, त्यांची नळजोडणी खंडीत करण्याची कायद्यामध्ये तसे विवरण आहे.यामुळे आता जे मालमत्ता कर भरण्यात कुचराई करतील, त्यांची नळजोडणी होणारा पाणी पुरवठा तोडण्यात येणार आहे. मात्र आता एखाद्या सोसायटीत काही लोकांनी कर भरलेला नसेल तर पूर्ण सोसायटीचा पाणीपुरवठा कसा तोडला जावू शकतो, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र आयुक्त व पालिकेवरील प्रशासक शेखर सिंह यांनी पत्रकार परिषेदेत याबाबत शहरवासीयांना आश्वस्त केले आहे.

Pimpri Chinchwad Shekhar Singh
Rapido Bike Taxi : बाईक टॅक्सी सेवा पुरविणाऱ्या 'रॅपिडो'ला हायकोर्टाचा दणका; सेवा बंद करण्याचे आदेश

नळजोडणी न तोडता फक्त कर न भरणाऱ्या लोकांचेच पाणी कसे तोडता येईल, यासाठी प्रयत्न करणार आहे, असे ते म्हणाले. महापालिकेच्या आवारात झालेल्या पत्रकार परिषदेत आरोग्य विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर, रविकिरण घोडके, विशेष कार्यकारी अधिकारी किरण गायकवाड इत्यादी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवडमध्ये 5 लाख 90 हजार निवासी व बिगरनिवासी मिळकतींची नोंदणी पालिकेकडे आहे. आजपर्यंत केवळ 565 कोटी रुपये कराचा भरणा झालेला आहे. तब्बल 1 लाख 62 हजार मिळकतधारकांकडून अनधिकृत बांधकाम शास्तीकर वगळता, मूळ मिळकतकरांची 480 कोटींचा कर अद्यापही बाकी आहे. हा कर वसूल व्हावे, नळजोड तोडण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

Pimpri Chinchwad Shekhar Singh
Pune News : पुण्याचं नाव बदला, मिटकरींची मागणी, तर आनंद दवेंनी घेतला आक्षेप!

काही कर थकबाकीदारांसाठी संपूर्ण सोसायटीचा पाणीपुरवठा तोडणे कितपत योग्य आहे का? याबाबत आयुक्त यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मालमत्ता कर जे मुदतीत भरणार नाहीत, त्यांची नळजोड खंडीत करण्याची कायद्याची तरतूद आहे. एखाद्या सोसायटीतील काहींनी करच भरलेला नसेल, तर संपूर्ण सोसायटीचा पाणीपुरवठा न तोडता, फक्त कर न भरणाऱ्यांचे पाणी कशाप्रकार तोडता येईल, यासाठी सोसायटीच्या लोकांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com