PM Modi Pune Visit: मोदींच्या सभेसाठी नेत्यांना टार्गेट; पदाधिकारी लागले कामाला

BJP Office bearers target gathering audience fo Modi Pune Program: शहर आणि जिल्ह्यातील भाजपचे दोन हजार पदाधिकारी कामाला लागले आहेत. मोदी यांच्या कार्यक्रमासाठी स्वतंत्र कार्यालय सुरू करून तेथून नियोजनाचे काम सुरू आहे.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Pune News: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (ता. 26) पुणे दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यामध्ये मोदींच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या दौऱ्यासाठी भाजप नेते जोरदार कामाला लागले आहे. नुकतेच या दौऱ्याच्या निमित्ताने नियोजनासाठी बैठक झाली. बैठकीत गर्दी जमविण्याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्याची माहिती आहे.

नुकतीच कर्वेनगर येथे नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पालखी मार्ग आणि इतर विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं. हा कार्यक्रम भाजपाचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या कर्वेनगर परिसरामध्ये आयोजित केला होता.महायुतीच्या दिग्गजांची फळी व्यासपीठावर होती. कोथरूड आणि परिसरात कार्यक्रमाची मोठी फ्लेक्सबाजी करण्यात आली होती. असे असतानाही कार्यक्रमाला अपेक्षित अशी गर्दी जमवण्यात अपयश आल्याच्या चर्चा सुरू आहे.

या कार्यक्रमांमध्ये जगन्नाथमहाराज पाटील यांच्या कीर्तनसेवेमुळे वारकरी संप्रदायाने थोडी फार गर्दी केल्यामुळे भाजपासाठी काहीशी दिलासा देणारी बाब होती. तरी देखील या कार्यक्रमातील रिकाम्या खुर्च्यांचे व्हिडिओ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, तसेच काँग्रेस कार्यकत्यांनीदेखील सोशल मीडियावर व्हायरल केले.

ही बाब भाजपच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळे खडबडून जागे होत भाजपने शहर व ग्रामीण भागांतील पदाधिकायांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुरुवारी होणाऱ्या कार्यक्रमासाठी गर्दी जमवण्याचे टार्गेट दिले असल्याचे सांगितले जात आहे.

PM Narendra Modi
Padmakar Valvi: 'एकनाथ शिंदे हे मूर्ख, नालायक मुख्यमंत्री'; माजी मंत्र्यांचं बेताल वक्तव्य

कर्वे नगर येथील कार्यक्रमांमध्ये खुर्च्यां रिकाम्या राहिल्या. त्यात भाजप कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे भाषणाला उभे राहतात घोषणाबाजी केली या घोषणांना खासदार सुप्रिया सुळे यांच्या समर्थकांनी उत्तर देखील दिले. सगळ्या गोष्टींचा चिंतन नुकत्याच झालेल्या भाजपच्या बैठकीत करण्यात आल्याचं बोललं जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यामध्ये या सगळ्या गोष्टी टाळण्याच्या दृष्टिकोनातून भाजपकडे नियोजन करण्यात आलं आहे. प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासाठी गर्दी जमविण्यासाठी 'टार्गेट' देण्यात आले. त्यासाठी शहर आणि जिल्ह्यातील भाजपचे दोन हजार पदाधिकारी कामाला लागले आहेत. मोदी यांच्या कार्यक्रमासाठी स्वतंत्र कार्यालय सुरू करून तेथून नियोजनाचे काम सुरू आहे.

केवळ पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्येच नव्हे, तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, पुरंदर, मावळ, मुळशी या तालुक्यांतून मोदी यांचा मुख्य कार्यक्रम होणाऱ्या एसपी कॉलेज मैदानावर गर्दी जमविण्याचे 'टार्गेट' पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

सध्या जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांवर अनेक ठिकाणी प्रशासक असल्यामुळे गर्दीसाठी माजी नगरसेवक, सदस्यांकडून देखील फारसा प्रतिसाद मिळत नाही; परंतु तरीदेखील गाड्यांची व्यवस्था आणि खर्चाची तजवीज करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com