PMC Bharti 2025 : सरकारी नोकरी हवीये? पुणे महानगरपालिकेकडून भरती जाहीर! या पदांसाठी भरती, आजच करा अर्ज!

Pune Municipal Corporation Recruitment : पुणे शहरातील नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी. पुणे महानगरपालिकेकडून ही एक उत्तम संधी उमेदवारांसाठी निर्माण झाली आहे.
PMC
PMC Sarkarnama
Published on
Updated on

PMC Jobs 2025 : पुणे शहरातील नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी. पुणे महानगरपालिका अंतर्गत कार्यरत असलेल्या पुणे शहर एड्स नियंत्रण संस्थेमार्फत प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिटमधील FICTC केंद्रासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही एक उत्तम संधी उमेदवारांसाठी निर्माण झाली आहे.  

या भरती अंतर्गत एकूण 12 रिक्त पदे भरली जाणार आहेत.

पदांची माहिती:

  1. समुपदेशक (Counselor)

  2. प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician)

'समुपदेशक' व 'प्रयोगशाळा तंत्रज्ञ' या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याबाबत अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत

या पदभारतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता जाणून घ्या?

समुपदेशक पदासाठी:

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी व मास्टर ऑफ सोशल वर्क (MSW) पदवी असणे आवश्यक.

  • एचआयव्ही/एड्स काउंसलिंगचा किमान 3 वर्षांचा अनुभव असावा.

प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी:

  • बी.एससी. व डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी (DMLT) उत्तीर्ण असणे आवश्यक.

  • HIV रक्तचाचणी लॅबमध्ये 3 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.

PMC
देशात मिळणार 3.5 कोटी नव्या नोकऱ्या, ELI योजना कशी करणार तुमचं भविष्य उज्वल! जाणून घ्या सविस्तर

अर्ज करण्याची अंतिम तारीख:

PMC महानगरपालिका अंतर्गत कार्यरत असलेल्या पुणे शहर एड्स नियंत्रण संस्थेमार्फत प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिटमधील FICTC केंद्रासाठी 9 जुलै 2025

अर्ज पाठविण्याचा पत्ता:
पुणे शहर एड्स नियंत्रण संस्था, डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र, 1 ला मजला, 663, शुक्रवार पेठ, गाडीखाना, पुणे – 411002 या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

PMC
8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता; 8 वा वेतन आयोग अद्याप अधांतरीच का?

महत्वाची सूचना:

  • उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावीत.

  • पासपोर्ट साइज फोटो अनिवार्य आहे.

  • अर्ज जाहिरातीत दिलेल्या नमुन्यानुसारच सादर करावा.

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी पुणे महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर https://www.pmc.gov.in/ भेट द्यावी.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com