Hand Grenade In Baner : बाणेर परिसरात सापडले हातबॉम्ब; पुण्यात खळबळ

Pune Crime News : बाॅम्ब ब्रिटिशकालीन असल्याची शक्यता
Hand Grenade found In Pune
Hand Grenade found In PuneSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यातील मेट्रो मार्गिकेचे काम वेगात सुरू आहे. या शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोच्या मार्गिकेचे खोदकाम सुरू असताना सोमवारी जुने हातबॉम्ब सापडले आहेत. बाणेर परिसरात सापडलेल्या या हातबॉम्बने पुण्यात खळबळ उडाली. दरम्यान, माहिती मिळताच पोलिस प्रशासनाची मोठी धावपळ उडाली.

पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गिकेचे काम वेगात सुरू आहे. सध्या या मार्गिकेवरील खांब उभे करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. दरम्यान, बाणेर परिसरातील खोदकाम करताना मेट्रो कर्मचाऱ्याना जुने हातबॉम्ब आढळून आले. हा प्रकार सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास घडला. बॉम्ब दिसताच कामगारांनी तेथील अधिकाऱ्यांना माहिती दिली. अधिकाऱ्यांनी हा प्रकार पोलिस प्रशासनाला कळवला.

Hand Grenade found In Pune
Election Results 2023 : इंदिरा गांधींचे सुरक्षा प्रमुख बनणार मुख्यमंत्री; निवडणुकीत केला चमत्कार

हातबॉम्ब सापडल्याची माहिती मिळताच चतु:शृंशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तात्काळ बाॅम्बशोधक नाशक पथकाला (बीडीडीएस) पाचारण करण्यात आले. सापडलेले हातबाॅम्ब जुने असल्याने धोका वाढतो. दरम्यान, हे हात बाॅम्ब ब्रिटिशकालीन असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे बीडीडीएस पथकातील अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी बाॅम्ब सुरक्षितस्थळी हलविले.

आता सापडलेले हात बॉम्ब जिवंत आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी यंत्रणा कामाला लागलेली आहे. हे हात बाॅम्ब निर्जनस्थळी नेऊन निकामी करण्यात येणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, मेट्रोच्या खोदकामात सापडलेल्या या हात बॉम्बने इतर ठिकाणी काळजी घेण्याची गरज असल्याची चर्चा पुण्यात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Hand Grenade found In Pune
Manoj Jarange Patil : आता एक इंचही मागे जणार नाही, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com