Pune BJP Meeting: पुण्यात सर्वात मोठी घडामोड! भाजपच्या बैठकीनंतर भिडे गुरुजी अन् CM फडणवीसांची भेट, बंद दरवाजाआड नेमकं काय ठरलं?

Sambhaji Bhide Guruji And Devendra Fadnavis Meeting : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचा आढावा घेण्यात आला.या बैठकीदरम्यान, शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांनी उपस्थिती लावली.
Sambhaji bhide guruji devendra fadnavis .jpg
Sambhaji bhide guruji devendra fadnavis .jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असल्यानं सर्वच राजकीय पक्षांनी आता तयारीसाठी वेग पकडला आहे. या निवडणुका महायुती की स्वबळावर निवडणुका लढवल्या जाणार याबाबत वेगवेगळी विधानं केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात शनिवारी (ता.12) भाजपची पश्चिम विभाग आढावा बैठक पार पडली. या बैठकीवेळी पुण्यात अतिशय महत्त्वाची घडामोड घडली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचा आढावा घेण्यात आला.या बैठकीदरम्यान, शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांनी उपस्थिती लावली. ते या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्यासाठी आले होते. पश्चिम महाराष्ट्राची बैठक संपल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी भिडे गुरुजी यांची भेट घेत बंद दाराआड चर्चा केली.या भेटीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

या भेटीवर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले,भिडे गुरुजी हे मला त्यांच्या मोहिमेचं निमंत्रण द्यायला आले होते. ही मोहीम डिसेंबरमध्ये आहे.याचंच निमंत्रण त्यांनी दिले.मी त्यांना निवडणुकीचं सगळं नियोजन बघून शक्य असेल तर मी येईन, असं संभाजी भिडे गुरूजींना (Sambhaji Bhide) सांगितल्याची माहिती फडणवीस यांनी माध्यमांना दिली.

सीएम फडणवीस म्हणाले,आजच्या पश्चिम महाराष्ट्राच्या आढाव्यामध्ये आमचे सर्व मंत्री,आमदार, पदाधिकारी आणि सगळे माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य,असे सगळे वेगवेगळे लोक एकत्रित होते. एका-एका जिल्ह्याचा आम्ही आढावा घेतला आहे,अतिशय सकारात्मक परिस्थिती आम्हाला पाहायला मिळत आहे.उत्साह आहे. युतीच्या संदर्भात देखील आम्ही स्पष्ट निर्देश दिले आहेत,त्या संदर्भातील सर्व अधिकार आम्ही जिल्हा पातळीवर दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

Sambhaji bhide guruji devendra fadnavis .jpg
Pune political meeting: पुण्यातील बैठकीत महायुतीच्या नेत्यांना दिल्या 'या' महत्त्वपूर्ण सूचना; बावनकुळेंनी सांगितले किती टक्के मतदान मिळणार?

जिथे शक्यता असेल, तिथे प्रत्येक ठिकाणी युतीचा प्रयत्न केला पाहिजे.काही ठिकाणी युती शक्य होणार नाही, तिथे आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढू,पण जरी स्वतंत्र लढलो, तरी मित्रपक्षावर टोकाची टीका करायची नाही, अशाप्रकारचे निर्देश आम्ही त्या ठिकाणी दिले आहेत त्यामुळे त्या - त्या ठिकाणीची परिस्थिती पाहून त्याप्रमाणे निर्णय घेतले जातील असंही फडणवीस म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com