PMC Election : जिल्हा परिषदेतून आले अन् पुण्याचे महापौर झाले; यंदाही तब्बल 11 जणांना संधी

PMC Election Former ZP Members Candidate : पुणे महापालिका निवडणुकीत यंदा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे माजी सदस्य उमेदवार म्हणून उतरले आहेत.
PMC Election Latest News
PMC Election Latest Newssarkarnama
Published on
Updated on

Pune News : गेल्या आठ वर्षांमध्ये पुणे जिल्ह्यातील एकूण 34 गावांचा पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत समावेश करण्यात आला आहे. या गावांमध्ये आता प्रथमच महानगरपालिकेच्या निवडणुका होणार असल्याने यापूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये सदस्य म्हणून काम केलेले सहा माजी प्रतिनिधी तसेच काही माजी सरपंच थेट महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्यांमध्ये रामदास दाभाडे (वाघोली), स्वाती टकले (उंड्री), अनिता इंगळे (कोंढवे-धावडे), जयश्री भूमकर (धायरी), सुरेखा धमिष्ठे (धायरी) आदींचा समावेश आहे. याशिवाय हवेली पंचायत समितीच्या माजी सभापती वसुंधरा उबाळे (वाघोली), माजी उपसभापती बंडू खांदवे (लोहगाव), हवेली तालुक्यातील पिसोळी गावच्या तत्कालीन सरपंच स्नेहल दगडे आणि गुजर-निंबाळकरवाडीचे माजी सरपंच व्यंकोजी खोपडे हे महापालिका निवडणुकीमध्ये आपले नशीब आजमावत आहेत.

यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य असलेले सुरेश कदम, बापूसाहेब पठारे, त्याचबरोबर पंचायत समिती सदस्य असलेले दत्तात्रय धनकवडे हे पुणे महापालिकेत निवडून आले. पुढे महापौरदेखील झाले.

यावेळच्या निवडणुकीत सुरेखा धमिष्ठे यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने, तर दाभाडे व भूमकर यांना भाजपने, स्वाती टकले यांना शिंदे गटाने, तर इंगळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारी दिली आहे. तर माजी सभापती वसुंधरा उबाळे आणि माजी उपसभापती बंडू खांदवे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.

PMC Election Latest News
Ladki Bahin Yojana : मतदानाआधी महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये येणार! लाडकी बहीण महापालिकेतही गेमचेंजर ठरणार?

याशिवाय माजी सरपंच स्नेहल दगडे आणि व्यंकोजी खोपडे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. याशिवाय दोन माजी जिल्हा परिषद वाघोलीच्या अर्चना कटके आणि मुंढवा केशवनगरमधील वंदना कोद्रे यांच्या कुटुंबातील व्यक्ती देखील महापालिका निवडणुकीत उमेदवार आहेत.

झेडपीतून आले अन् महापौर झाले...

यापूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेले शंकरराव उरसाळ हे पुण्याचे महापौर झाले होते. त्याचबरोबर नामदेवराव मते हेही जिल्हा परिषदेत सदस्य होते. त्यांनी देखील महापालिकेत येऊन पद भूषवले. अलीकडच्या काळात हवेली पंचायत समितीचे उपसभापती राहिलेले दत्तात्रय धनकवडे हे पुण्याचे महापौर झाले होते ते यंदा देखील निवडणूक मैदानात आहेत.

PMC Election Latest News
Uddhav Thackeray On Ameet Satam : 'मुंबईचे ममदानीकरण', साटम यांचा आरोप; उद्धव यांनी 'ठाकरी' शैलीत सुनावलं, 'कोण? चाटम.., चाटम का?'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com