Pune Election: पुण्यातील इच्छुकांचा संयम संपला! यादीची वाट न बघता भाजपतर्फे 6 जणांचे अर्ज; वसंत मोरेही रिंगणात

Pune Election: पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारी यादी जाहीर केलेली नाही. यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुकांची घालमेल वाढली आहे.
Vasant More_Yogesh Mulik
Vasant More_Yogesh Mulik
Published on
Updated on

Pune Election: पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारी यादी जाहीर केलेली नाही. यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुकांची घालमेल वाढली असून काही इच्छुकांनी ए, बी, फॉर्मची वाट न पाहता अर्ज दाखल झाले आहेत, आज २५ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. यात भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचे बंधू योगेश मुळीक यांचाही समावेश आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे वसंत मोरे यांनीही अर्ज दाखल केला आहे.

Vasant More_Yogesh Mulik
Pune BJP: मुलांच्या उमेदवारीसाठी आमदारांची प्रतिष्ठा पणाला! रविवारी जाहीर होणार भाजपची पहिली यादी

महापालिका निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीतील जागा वाटप अद्याप निश्‍चित झालेले नाही. कोणाला किती जागा द्यायच्या व कोणती जागा द्यायची यावरून या पक्षांमध्ये प्रचंड वादावादी सुरु असून, एकमत होण्यास उशीर होत आहे. पण यामुळे इच्छुक उमेदवारांची अस्वस्थता वाढत आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजचा तिसरा दिवस आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी इच्छुकांनी तयारी केली आहे.

Vasant More_Yogesh Mulik
अरवली पर्वत रागांवरुन राजकारण सुरु; नेमका वाद काय?

आजच्या दिवशी प्रभाग क्रमांक २९ एरंडवणे हॅपी कॉलनीतून भाजपतर्फे माधुरी सहस्रबुद्धे, प्रभाग क्रमांक ५ कल्याणीनगर-वडगाव शेरीतून योगेश मुळीक, रूपाली तारळकर, प्रभाग क्रमांक २ फुलेनगर-नागपूरचाळ मधून शामा जाधव, प्रभाग क्रमांक ४ खराडी-वाघोलीमध्ये प्रदीप सातव, प्रभाग क्रमांक ७ गोखलेनगर-वाकडेवाडीतून ओंकार कदम यांनी अर्ज भरले आहेत.

Vasant More_Yogesh Mulik
Digvijaya Singh: अडवाणींसोबत मोदींचा फोटो शेअर करत काँग्रेसच्या या दिग्गज नेत्यानं RSSचं केलं कौतुक; काँग्रेसमध्ये भूकंप!

काँग्रेसतर्फे प्रभाग क्रमांक २७ नवी पेठ पर्वतीमधून किरण म्हात्रे, प्रभाग क्रमांक १३ पुणे स्टेशन जयजवाननगर मधून मेहमूद नदाफ, प्रभाग क्रमांक ४ रमेश पऱ्हाड यांनी अर्ज भरला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून प्रभाग क्रमांक २५ शनिवार पेठ-महात्मा फुले मंडइमधून परेश खांडके, प्रभाग क्रमांक ३८ बालाजीनगर-आंबेगाव-कात्रजमधून वसंत मोरे यांनी अर्ज भरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रभाग क्रमांक ३९ अप्पर सुपर इंदिरानगर मधून अभिलाषा घाटे, प्रभाग क्रमांक १३ नितीन रोकडे, प्रभाग क्रमांक ४ तेजश्री पऱ्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे प्रभाग क्रमांक ४ प्रकाश जमधडे, विनिता जमधडे यांचे अर्ज दाखल झाले आहेत. या उमेदवारांनी अर्ज भरले असले तरी ते पक्षाचे अधिकृत उमेदवार नाहीत.

Vasant More_Yogesh Mulik
Nashik News: नाशिकमध्ये शिंदे सेनेची मोठी खेळी! छगन भुजबळांचे कट्टर समर्थक शिवसेनेच्या गळाला

एकाच उमेदवाराचे तीन पक्षातून अर्ज

एकीकडे एका पक्षातून उमेदवारी मिळवताना इच्छुकांची दमछाक होत आहे. पण एका उमेदवाराने ए, बी फॉर्म नसतानाही तीन पक्षांच्या नावाने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. रमेश पऱ्हाड यांनी काँग्रेस, राष्‍ट्रवादी काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यातर्फे प्रभाग क्रमांक ४ मधून अर्ज दाखल केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com