PMC Eletion : पुणे महापालिकेसाठी विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. मात्र, आम आदमी पार्टीने 25 जणांची पहिली उमेदवारी यादी जाहीर करत आघाडी घेतली आहे. भाजप विरोधात सर्व पक्ष एकत्र येत निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात असताना 'आप'ने उमेदवारी यादी जाहीर करत ते स्वतंत्र लढणार असल्याचे स्पष्ट केले.
'आप'चे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी आपल्या सोशल मिडिया हँडवर ही यादी प्रसिद्ध शेअर केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, गेल्या तीन वर्षापासून पुणे महानगरपालिका निवडणुका प्रलंबित होत्या. प्रशासकीय राज मध्ये बेबंद निर्णयपद्धती आणि मनमानी नागरिकांनी पाहिली. सत्ता लाभासाठी वेगवेगळ्या प्रस्थापित पक्षांमध्ये युत्या आणि तोडफोड पाहिली. एक सांस्कृतिक, शैक्षणिक शहर असलेले पुणे, त्याची ओळख बदलून आता गुन्हेगारीचे, अपघातांचे शहर अशी झाली आहे.
'पुणेकरांना आता बदल हवा आहे आणि आम आदमी पार्टीच्या स्वरूपामध्ये हा पर्याय आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. यासाठी पुण्यामध्ये स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या जातील. जनतेच्या मूलभूत विकासाच्या प्रश्नांवरती म्हणजे वाहतूक कोंडी आरोग्य सोयी, दर्जेदार शिक्षण, भयमुक्त पुणे यावर प्रचारात भर दिला जाईल.', असे देखील त्यांनी म्हटले आहे.
शितल कांडेलकर: प्रभाग ३ (अ) ओबीसी महिला
संतोष काळे : प्रभाग 5 (अ) ओबीसी सर्वसाधारण
श्रद्धा शेट्टी : प्रभाग 6 (अ) अनुसूचित जाती
शंकर थोरात : प्रभाग 7 (ड) सर्वसाधारण
विकास चव्हाण : प्रभाग 8 (अ) अनुसूचित जाती
अँन अनिश : प्रभाग 8 (क) सर्वसाधारण महिला
सुदर्शन जगदाळे : प्रभाग 9 (ड) सर्वसाधारण
आरती करंजावणे: प्रभाग 10 सर्वसाधारण महिला
अॅड. कुणाल घाटे : प्रभाग 10 (ड) सर्वसाधारण
अॅड. दत्तात्रय भांगे :- प्रभाग 11 (ड) सर्वसाधारण
समीर आरवडे : प्रभाग 19 (क) सर्वसाधारण
मधू किरण कांबळे : प्रभाग 22 (अ) अनुसूचित जाती महिला
उमेश बागडे:- प्रभाग 23 (क) अनुसूचित जाती
विजया किरण कद्रे प्रभाग 23 (ब) ओबीसी महिला
निरंजन अडागळे: प्रभाग 26 (अ) अनुसूचित जाती
अनिल कोंढाळकरः प्रभाग 27 (ड) सर्वसाधारण
अॅड.अमोल काळे : प्रभाग 31 (ड) सर्वसाधारण
निलेश वांजळे प्रभाग 32 (ड) सर्वसाधारण
सुरेखा भोसले:- प्रभाग 32 (क) सर्वसाधारण महिला
रमेश मते : प्रभाग 33 (ड) सर्वसाधारण
धनंजय बेनकर प्रभाग 34 (अ) ओबीसी सर्वसाधारण
कुमार धोंगडे : प्रभाग 39 (ड) सर्वसाधारण
गजानन भोसले: प्रभाग 40 (ड) सर्वसाधारण
प्रिया निलेश कांबळे: प्रभाग 14 (अ) अनुसूचित जाती महिला
प्रशांत कांबळे प्रभाग 38(इ) सर्वसाधारण
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.