Local Body Elections : शरद पवार, ठाकरे अन् काँग्रेसचा विचार पक्का, पण एकच गोष्ट ठरतेय अडथळा...

Opposition Unity: Shiv Sena (UBT), Congress, and NCP Talks : 2017 च्या पुणे महापालिका निवडणुकीत भाजपने मोठ्या फरकाने 97 जागा जिंकत वर्चस्व प्रस्थापित केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने 42, शिवसेनेने 10 आणि काँग्रेसने 9 जागा मिळवल्या होत्या.
Mahavikas Aghadi-Mahayuti
Mahavikas Aghadi-MahayutiSarkarnama
Published on
Updated on

Pune News : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांत एकत्र निवडणूक लढवण्याबाबत प्राथमिक एकमत झाले आहे. मात्र, जागा वाटपाच्या मुद्द्यावरून आघाडीत ‘मोठा भाऊ’ कोण, यावरून तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

2017 च्या पुणे महापालिका निवडणुकीत भाजपने मोठ्या फरकाने 97 जागा जिंकत वर्चस्व प्रस्थापित केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने 42, शिवसेनेने 10 आणि काँग्रेसने 9 जागा मिळवल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध होती आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली लढली होती. परिणामी, यावेळेच्या जागा वाटपामध्ये राष्ट्रवादीच मोठा भाऊ असावा, अशी शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाची भूमिका आहे.

गेल्या दोन वर्षांत राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे गटाची ताकद घटली, तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मोठी फूट पडली. पुण्यात तर जवळपास 90 टक्के माजी नगरसेवक अजित पवार गटात गेले आहेत. यामुळे शरद पवार गटाची संख्या केवळ 3-4 नगरसेवकांपुरती मर्यादित झाली आहे.

Mahavikas Aghadi-Mahayuti
Indrayani River Bridge Collapsed update : कुंडमळा पूल दुर्घटनेत 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती, मृतांचा आकडा वाढण्याची भीती, पुलाबाबत अजितदादांनी दिली महत्वाची माहिती...

ठाकरेंच्या शिवसेनेचीही 9 पैकी 5 नगरसेवक भाजपमध्ये गेले आहेत. मात्र, पुण्यात उद्धव ठाकरे गटाची काही प्रमाणात पकड टिकून आहे. काँग्रेसकडे मात्र सध्या एकसंधतेचे स्वरूप आहे आणि फुटीचा फटका अद्याप बसलेला नाही. या पार्श्वभूमीवर, जागा वाटपाच्या मुद्द्यावरून तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.

Mahavikas Aghadi-Mahayuti
Solapur NCP SP : सोलापुरातील निष्ठावंत नेता शरद पवारांची साथ सोडणार; खासदार मोहिते पाटलांवर हल्ला चढवत घेतला निर्णय

राष्ट्रवादीने मागील निवडणुकांतील जागा कायम ठेवून उर्वरित जागांवर वाटप करावे, अशी भूमिका मांडली आहे. तर, शिवसेना आणि काँग्रेस बलाबलानुसार वाटप व्हावे, अशी भूमिका घेत आहेत. काँग्रेसमधील काही नेते तर स्वबळावर लढण्याचेही संकेत देत आहेत.

त्यामुळे पुण्यातील आगामी महापालिका निवडणुकीत भाजपविरोधात आघाडी करणे तिन्ही पक्षांसाठी अपरिहार्य असले, तरी ‘मोठा भाऊ’ कोण आणि कोणत्या आधारावर जागा वाटप करायची, यावरून आघाडीतील संघर्ष टोकाला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचा एकत्र लढा शक्य होईल का, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com