PMC Mayor Election: पुण्यात महापौर, उपमहापौरपदासाठी तिरंगी लढत! नाट्यमय घडामोडीनंतर राष्ट्रवादीनं आणला 'ट्विस्ट'

PMC Mayor Election: राज्यातील भाजपसमवेत महायुतीमध्ये असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही ऐनवेळी महापौर, उपमहापौरपदासाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल करत महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत 'ट्विस्ट' निर्माण केला आहे.
PMC Election 2026
PMC Election 2026Sarkarnama
Published on
Updated on

PMC Mayor Election: महापालिका निवडणुकीत भाजपने दुसऱ्यांदा एकहाती सत्ता आणल्यानंतर मंगळवारी भाजपने महापौर, उपमहापौरपदासाठी आपले अर्ज दाखल केले. त्याचवेळी काँग्रेस पक्षानेही भाजपला विरोधाची भूमिका कायम ठेवत दोन्ही पदांसाठी आपले उमेदवार दिले. तर, राज्यातील भाजपसमवेत महायुतीमध्ये असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही ऐनवेळी महापौर, उपमहापौरपदासाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल करत महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत 'ट्विस्ट' निर्माण केला आहे. त्यामुळे महापौर, उपमहापौरपदासाठी आता भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशी तिरंगी लढत होण्याची शक्‍यता आहे.

PMC Election 2026
Maharashtra Budget 2026: अजितदादांनी तयार केलेलं बजेट CM फडणवीस 'या' दिवशी मांडणार विधीमंडळात

महापालिका निवडणुकीमध्ये भाजपने सलग दुसऱ्यांदा एकहाती सत्ता आणली. यावेळी झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने तब्बल ११९ जागांवर विजय मिळवीत महापालिकेवर आपला जम बसविला. दरम्यान, मंगळवारी महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. त्यानुसार, भाजपकडून महापौरपदासाठी मंजुषा नागपुरे, तर उपमहापौर पदासाठी भाजप-रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) परशुराम वाडेकर यांची निवड केली. त्यानुसार, नागपुरे व वाडेकर यांनी अर्ज दाखल केले. दरम्यान, केंद्र, राज्याप्रमाणे काँग्रेस पक्षाने महापालिकेतही विरोधी भुमिका कायम ठेवत महापौर, उपमहापौर पदासाठी आपले उमेदवार दिले. शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी महापौरपदासाठी अश्‍विनी लांडगे यांची, तर उपमहापौरपदासाठी साहिल केदारी यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर लांडगे व केदारी यांनी आपले अर्ज दाखल केले.

PMC Election 2026
...तर 'पीएम किसान' योजनेचे 2000 रुपये अडकू शकतात; 22व्या हप्त्याबाबत महत्वाची अपडेट

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत उमेदवार न देण्याबाबत मंगळवारी सकाळपासून चर्चा होती. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मत म्हणजे भाजपला मत, हे आम्ही यापूर्वीच सांगितले होते', याचा माध्यमांशी बोलताना पुनरुच्चार केला. त्यानंतर, काही वेळातच सूत्रे फिरली. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अॅड. निलेश निकम, शहराध्यक्ष सुनील टिंगरे व आमदार चेतन तुपे यांची बैठक होऊन त्यामध्ये चर्चा झाली. पक्षाच्या वरिष्ठांसमवेतही पदाधिकाऱ्यांनी संवाद साधला. त्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही ऐनवेळी महापौर, उपमहापौरपदासाठी अर्ज भरण्याचे निश्‍चित केले. त्यानुसार, महापौरपदासाठी शीतल सावंत, तर उपमहापौर पदासाठी दत्ता बहिरट यांची नावे निश्‍चित करून सावंत व बहिरट यांनी तत्काळ आपले अर्ज दाखल केले. प्रारंभी महापौर, उपमहापौर पदासाठीची निवडणूक केवळ औपचारिकता वाटत होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीनंतरच्या नाट्यमय घडामोडीनंतर तिरंगी लढतीत रूपांतर झाले आहे.

PMC Election 2026
Supreme Court: "संविधान मानायचं नसेल तर भारत सोडा"; सुप्रीम कोर्टाचा संताप, कोणाला फटकारलं? जाणून घ्या

राष्ट्रवादी काँग्रेस लढणार की माघार घेणार?

महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक आता तिरंगी होणार हे निश्‍चित झाले आहे. येत्या सोमवारी (ता.९) महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया होणार आहे. त्याच दिवशी उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी १५ मिनिटांचा कालावधी मिळणार आहे. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक लढणार की त्यातून माघार घेणार हे स्पष्ट होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com