Attack on Jitendra Awhad Car : आव्हाडांच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; स्वराज्य संघटनेचा नेता ताब्यात

Swarajya Sanghatna News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या वाहनावर गुरुवारी दुपारी अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. या प्रकारानंतर वातावरण तापले आहे.
Jitendra Awhad.jpeg
Jitendra Awhad.jpegSarkarnama
Published on
Updated on

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या वाहनावर गुरुवारी दुपारी अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. या प्रकारानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी लगेचच तपासाची सूत्रे हलवली. या प्रकरणी पुणे पोलिसांनी शिवाजीनगर भागातून चौकशीसाठी एकाला ताब्यात घेतले आहे.

पुणे पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी शिवाजीनगर भागातून चौकशीसाठी एकास ताब्यात घेतले आहे. स्वराज्य पक्ष सरचिटणीस, प्रवक्ते धनंजय जाधव याची चौकशी पोलिसांकडून सुरु आहे. या प्रकरणाच्या अधिक चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात पुढील चौकशीसाठी देण्यात येणार आहे.

दरम्यान, गुरुवारी दुपारी आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या गाडीवर स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. माजी खासदार आणि स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे यांचं रक्त हिरवं आहे, अशा पद्धतीचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विशाळगडाची पाहणी करण्यासाठी आलेले असताना काही दिवसापूर्वी मांडली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) आमदार जितेंद्र आव्हाड हे ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी जात असताना स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांची गाडी पाठीमागे असतानाही हा हल्ला घडवून आणला आहे.

Jitendra Awhad.jpeg
BJP Vs Congress : नागपुरात राजकारण पेटलं; फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण, भाजप- काँग्रेसमध्ये जुंपली

दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी रक्त तपासून घ्यावे, या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या वाहनावर दगड, काठ्यांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्याची जबाबदारी स्वराज्य संघटनेने स्वीकारली आहे.

या हल्ल्यानंतर संतापलेले जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या विधानावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. तर हल्लेखोरांकडे माझे मी पाहून घेईन, त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. हा भ्याड हल्ला आहे, असे मतही आव्हाड यांनी व्यक्त केले.

Jitendra Awhad.jpeg
Mumbai MVA News : मुंबईत ठाकरेंना काँग्रेसच देणार धक्का; 16 जागांवर इच्छुकांची तयारी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com