Pune News, 03 Mar : राज्यासह पुणे (Pune) जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशातच चाकणमध्ये दरोडेखोरांना पकडायला गेलेल्या पोलिसांवरच कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पोलिस (Police) आणि दरोडेखोरांच्या झटापटीमध्ये दोन पोलिस कर्मचारी आणि एक दरोडेखोर जखमी झाला आहे. यावेळी दरोडेखोरांना रोखण्यासाठी पोलिस उपायुक्तांनी गोळीबार केल्याचं देखील समोर आलं आहे. या गोळीबारात एका दरोडेखोराच्या पायाला गोळी लागली आहे.
चाकण (Chakan) पोलिस चौकीच्या हद्दीत रविवारी (ता.02) मध्यरात्री ही थरारक घटना घडली. चाकणमधील बहुळ परिसरात काही दिवसांपूर्वी वृद्ध दाम्पत्य असलेल्या घरात घरफोडीची घटना घडली होती. यामध्ये सहा दरोडेखोरांनी चाकू आणि कोयत्याचा धाक दाखवत लूटमार केली होती.
गेल्या काही दिवसांपासून चाकण परिसरात अशा घटना सातत्याने घडत आहेत. अशातच काल मध्यरात्री चिंचोशी गावात दरोडेखोर दरोडा टाकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवाजी पवार (Shivaji Pawar) यांना मिळाली होती. त्यामुळे शिवाजी पवार आणि चाकण पोलिस ठाण्यातील इतर पोलिसांची दोन पथके दरोडेखोरांना पकडण्यासाठी केंदूर घाटात सापळा रचून थांबले होते.
यावेळी दरोडेखोर येताच त्यांना पकडण्यासाठी पुढे सरसावलेल्या पोलिसांवर दरोडेखोरांनी थेट कोयत्यांनी हल्ला केला. यामध्ये उपायुक्त शिवाजी पवार आणि फौजदार प्रसन्न जऱ्हाड जखमी झाले आहेत. या झटापटी दरम्यान स्वसंरक्षणासाठी, उपायुक्त पवार यांनी दोन गोळ्या झाडल्या त्यातील एक गोळी एका आरोपीच्या पायाला लागल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली आहे.
त्याला घटनास्थळीच अटक करण्यात असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दुसरा आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून जात असताना त्याला पाठलाग करून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी पकडलेला आरोपी सचिन भोसले हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी नऊ गंभीर गुन्हे दाखल आहेत. बहुळ येथील दरोडा देखील सचिन चंदर भोसले आणि मिथुन चंदर भोसले हे मुख्य आरोपी आहेत. त्यामुळे ते पोलिसांच्या रडारवर होते. ते पुन्हा दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती चाकण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.