Pune Crime News : खरंच धाक उरलाय ? पोलिस आयुक्तांचा इशारा, दोनच दिवसांत जेलमधून बाहेर आलेल्या गुंडाने काढली रॅली

Viral Rally Video News : पुण्यात येरवडा जेलमधून सुटल्यानंतर मोक्कातील आरोपीने काढली रॅली, व्हिडिओ व्हायरल होताच आरोपीने धूम ठोकली आहे.
Ips Amitheshkumar
Ips Amitheshkumar Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : मोक्का कारवाई अंतर्गत येरवडा जेलमध्ये असलेला प्रफुल उर्फ गुड्या गणेश कसबे हा तब्बल साडे तीन वर्षांनी जेलमधून बाहेर आला. त्यानंतर त्याने आणि त्याच्या सुमारे 50-60 समर्थकांनी येरवडा बाजार परिसरात आलिशान कारमधून रॅली काढली. या रॅलीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काही लोकांना मस्ती आली आहे, त्यांना सक्त ताकीद आहे. बेकायदेशीर धंदे केले, गँग चालवून खंडणी मागितली आणि बळाच्या जोरावर जमीन खाली करावयाला लावत असाल तर हे शहर सोडून जा, नाहीतर तुम्हाला तुमच्या सात पिढ्यांची आठवण करुन देऊ, असा सज्जड दम पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी एका कार्यक्रमावेळी बोलताना दिला होता. त्यानंतर दोनच दिवसात रॅली काढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

या रॅली दरम्यान परिसरातील नागरिकांना रॅलीमधील युवकांनी धमकावले होते असे देखील नागरिक सांगत आहेत. या रॅली दरम्यान आता 'बाप बाहेर आलाय, बॉस बाहेर आलाय' म्हणून रॅलीमधील युवकांनी नागरिकांना शिवीगाळ केली. व्हिडिओ आणि घडलेल्या प्रकाराबाबत नागरिकांनी लक्ष्मी नगर (शास्त्रीनगर) पोलीस (Police) चौकीमध्ये माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी संबंधित आरोपीला नोटीस बजावली असून तो फरार झाला आहे, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Ips Amitheshkumar
Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडच्या अडचणीत भर; खंडणी प्रकरणी आता 'या' साथीदाराचे घेतले व्हॉईस सॅम्पल्स

येरवडा येथील लक्ष्मीनगर परिसरातील रहिवाशांच्या घरात घुसून या सराईत गुन्हेगारांनी घरांची तोडफोड करुन रस्त्यावर लावलेली वाहनांची नासधूस करून दहशत माजविली होती. ही घटना जुलै 2021 मध्ये घडली होती. यानंतर येरवडा पोलिसांनी खुनाचा प्रयत्न करणे, दहशत माजविणे, बेकायदेशीर हत्यारे बाळगणे, या अंतर्गत गुन्हे दाखल केले होते. यानंतर या प्रकरणात पोलिसांकडून गुंड्या कसबेसह 14 जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर यातील तिघा जणांवर तडीपारची कारवाई देखील करण्यात आली त्यामध्ये गुंड्याचा देखील समावेश होता. तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupata) यांनी जुलैमध्ये घडलेल्या या प्रकरणात 14 जणांवर मोका अंतर्गत कारवाई केली होती.

Ips Amitheshkumar
Santosh Deshmukh Case : मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीनंतर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

त्यानंतर गेली साडेतीन वर्षे गुंड्या कसबे हा येरवडा तुरुंगात होता. त्याला नुकताच जामीन मंजूर झाला होता. त्यानंतर त्याची दोन दिवसांपूर्वी तुरुंगातून सुटका झाली. सुटकेनंतर त्याने व त्याच्या सुमारे 50 ते 60 समर्थकांसह येरवडा बाजार परिसरातून कारमधून रॅली काढली. रात्रीच्या वेळी काढलेल्या या रॅली दरम्यान गुंड्याच्या समर्थकांनी संपूर्ण परिसरात दहशत माजविली असल्याचं नागरिकांनी सांगितले.

Ips Amitheshkumar
Anjali Damaniya Claims : परळीत दर तीन दिवसांना एक खून; अंजली दमानियांच्या दाव्याने मोठी खळबळ

रॅलीची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला नोटीस बजावली होती. आता पोलिसांनी प्रफुल्ल उर्फ गुड्या कसबे, त्याच्या स्वागतासाठी त्याचे 11 साथीदार व इतर 35 ते 40 इसम यांनी त्यांच्याकडील 4 चार चाकी गाड्या व 20 ते 30 दुचाकी गाड्या वरून येऊन गैर कायद्याची मंडळीचा जमाव जमवून त्यांच्याकडील चार चाकी व दुचाकी वाहने बेदरकारपणे चालवून आरडाओरडा करून व घोषणा देऊन येरवडा परिसरामध्ये दहशत निर्माण केली, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत असून आरोपी पसार झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

Ips Amitheshkumar
Ajit Pawar : पगार रखडलेल्या शिक्षकांची बाजू घेत भर पत्रकार परिषदेतून अजितदादांनी लावला थेट सचिवांना फोन अन् ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com