Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडच्या अडचणीत भर; खंडणी प्रकरणी आता 'या' साथीदाराचे घेतले व्हॉईस सॅम्पल्स

Voice samples extortion Case : वाल्मिक कराडने पवनचक्कीची निर्मिती करणाऱ्या आवादा एनर्जी या कंपनीकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. कराडने आरोपी विष्णू चाटे याच्यामार्फत कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला होता.
Walmik Karad, Vishnu chate
Walmik Karad, Vishnu chate Sarkaranama
Published on
Updated on

Beed News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला २९ दिवस झाले आहेत. या हत्या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे एसआयटीने हाती घेतल्यानंतर तपास कामाला वेग आला आहे. या प्रकरणातील फरार असलेल्या दोन आरोपींना शनिवारी ताब्यात घेतले आहे. या खून प्रकरणांनंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले असतानाच शनिवारी परभणीत मोर्चा निघाला तर रविवारी पुण्यात मोर्चा निघाला. त्यानंतर खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास सध्या वेगाने सुरु आहे.

वाल्मिक कराडने पवनचक्कीची निर्मिती करणाऱ्या आवादा एनर्जी या कंपनीकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. कराडने आरोपी विष्णू चाटे याच्यामार्फत कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला होता. त्यादृष्टीने आता पोलीस तपास करत असून त्यांनी विष्णू चाटेचे व्हॉईस सॅम्पल्स घेतले आहेत. त्यामुळे येत्या काळात वाल्मिक कराडच्या अडचणीत भर पडणार आहे.

Walmik Karad, Vishnu chate
Santosh Deshmukh Case : मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीनंतर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा तपास सध्या वेगाने सुरु आहे. कराडने पवनचक्कीची निर्मिती करणाऱ्या आवादा एनर्जी या कंपनीकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. वाल्मिक कराडने आरोपी विष्णू चाटे याच्यामार्फत कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर विष्णू चाटे हाच आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेऊन वाल्मिक कराड यांना भेटण्यासाठी गेला होता, असा आरोप आहे. त्यादृष्टीने आता पोलीस यंत्रणा तपास करत आहे. पोलिसांनी या प्रकरणात विष्णू चाटे याचे व्हॉईस सॅम्पल्स घेतले आहेत. त्यामुळे येत्या काळात कराडच्या अडचणीत भर पडणार आहे.

Walmik Karad, Vishnu chate
Santosh Deshmukh Murder Case : ''महाराष्ट्राला यातून एक उदाहरण मिळणार'' ; मुख्यमंत्र्यांची भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं सूचक विधान!

या खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या विष्णू चाटेचा मोबाईल पोलिसांना (Police) सापडलेला नाही, त्याचा तपास सध्या सुरु आहे. त्याच खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडचे सुद्धा व्हॉईस सॅम्पल तपासले जाणार आहेत. मस्साजोग येथील आवादा एनर्जी पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्यास दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी विष्णू चाटेचे व्हाईस सॅम्पल सीआयडीकडून कलेक्ट करण्यात आले आहेत.

Walmik Karad, Vishnu chate
Dada Bhuse : शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे शिकवणार इंग्रजी शाळांना मराठीचा 'धडा'

या प्रकरणात आता वाल्मिक कराडने अधिकाऱ्यांकडून किती खंडणी मागितली, त्यांच्यात नेमके काय बोलणे झाले, याचा उलगडा या सगळ्यातून होऊ शकतो. त्यासोबतच दुसरीकडे या प्रकरणांत वाल्मिक कराड याचेही व्हाईस सॅम्पल घेऊन ते मॅच होतात का ? हे तपासले जाणार आहेत. त्यामुळे या तपासातून काय निष्पन्न होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Walmik Karad, Vishnu chate
Pune Corporators : महानगरपालिकेच्या तोंडावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का देणारे कोण आहेत पाच नगरसेवक

दरम्यान, संतोष देशमुख हत्याप्रकरणी सीआयडीकडून (CID)चौकशी केली जात आहे. देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील एकमेव फरार आरोपी कृष्णा आंधळे हा अद्याप फरार आहे. त्याच्या तपासासंदर्भात संभाजी वायबसे व सुरेखा वायबसे या दाम्पत्याची चौकशी होऊ शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे. आरोपी सुदर्शन घुले आणि सांगळे यांना शोधून काढण्यात वायबसे दाम्पत्याने दिलेली माहिती महत्त्वाची ठरली होती. त्यामुळे येत्या काळात त्यांची पुन्हा एकदा चौकशी होण्याची शक्यता आहे.

Walmik Karad, Vishnu chate
Patangrao Kadam : 'रयत'मध्ये अर्धवेळ शिक्षक ते भारती विद्यापीठाचे संस्थापक, असा होता पतंगराव कदमांचा संघर्ष

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com