माजी नगरसेवकाला ‘हनीट्रॅप’मध्ये ओढण्याचा ‘नर्स’चा प्रयत्न पोलिसांनी उधळला

वीस लाख रुपये दिले नाहीत, तर आत्महत्या करीन, असेही तिने धमकावले होते.
honey trap

honey trap

sarkarnama

Published on
Updated on

पिंपरी ः पुणे जिल्ह्यातील खेडचे आमदार दिलीप मोहिते यांना हनीट्रॅपमध्ये (honeytrap) अडकावण्याचा प्रयत्न या वर्षीच्या एप्रिल महिन्यात उधळला गेला. साताऱ्यातील एका तरुणीला हाताशी धरून मोहितेंना बदनाम करण्याच्या कटात त्यांचा पुतण्या शैलेशसह तिघे सहभागी होते. त्यांनी तरुणीला नव्वद हजार रुपये देत पुण्यात फ्लॅटचे आमिष दाखवले होते. मात्र, तिनेच मोहितेंच्या मयूर या दुसऱ्या पुतण्याला फोन केला अन हा हनीट्रॅप फसला. तसाच काहीसा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) गुरुवारी (ता. ३० डिसेंबर) समोर आला. या घटनेत पालिकेच्या ड प्रभाग समितीचे माजी स्वीकृत सदस्य असलेल्याला बिल्डरला हनीट्रॅपमध्ये अडकावण्याचा प्रयत्न एका नर्सने केला. मात्र, वाकड पोलिसांनी तो उधळून लावला. तिच्याविरुद्ध वीस लाखांची खंडणी उकळल्याचा गुन्हा दाखल करीत तिला अटक केली. (Police foil 'nurse' attempt to drag ex-approved member into 'honeytrap')

सविता अभिमान सूर्यवंशी (वय ४०, रा. ताडीवाला हिलरोड, पुणे) असे या नर्सचे नाव असून तिला अटक करण्यात आला आहे, असे वाकडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी सांगितले. येत्या दोन जानेवारीपर्यंत तिला पोलिस कोठडी ठेवण्याचा आदेश शुक्रवारी (ता. ३१) न्यायालयाने दिला. तिने आणखी काही रुग्णांना हनीट्रॅपमध्ये ओढून त्यांची फसवणूक केली असल्याचा संशय आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

<div class="paragraphs"><p>honey trap</p></div>
सर्व २७ जागा राष्ट्रवादीला जिंकून देतो; वडगाव शेरीला महापौरपद द्या : टिंगरेंनी मागितला शब्द

रुग्णाशी जवळीक साधून ती त्यांच्याशी व्हॉटस ॲपवर चॅट करीत असे. त्यानंतर हे चॅट संबंधित रुग्णांच्या घरी म्हणजे कुटुंबाला दाखविण्याची आणि सोशल मीडियात टाकून बदनाम करीन, अशी धमकी देत होती. मुलींना फसवतो; म्हणून पोलिसांत तक्रार करीन, असे सांगत होती. असाच प्रकार तिने या गुन्ह्यातील ५४ वर्षीय फिर्यादींच्या बाबतीत केला. वीस लाख रुपये दिले नाहीत, तर आत्महत्या करीन, असेही तिने धमकावले होते. त्याला घाबरून काही पैसे फिर्यादीने दिले. मात्र, त्यानंतरही तिने पुन्हा पैसे मागणे सुरुच ठेवले. त्यामुळे वैतागून फिर्यादींनी पोलिसांत धाव घेतली. पिंपळे सौदागर येथील शिवार गार्डन हॉटेलजवळ गुरुवारी दुपारी १२ लाख घेण्यासाठी आलेल्या सविताला सापळा लावून पोलिसांनी पकडले. बारा लाख रुपयांच्या या रकमेत फक्त २४ हजार रुपयेच खरे होते. बाकीचे नोटांच्या आकाराचे कोरे कागद होते. दोन हजारांच्या सहा बंडलमध्ये खाली आणि वर फक्त खऱ्या नोटा ठेवून मध्ये कोरे कागद पोलिसांनी ठेवले होते.

<div class="paragraphs"><p>honey trap</p></div>
सिंधुदुर्ग बॅंकेत १५ नव्या चेहऱ्यांची एन्ट्री : दोन्ही पॅनेलप्रमुखांसह दहा संचालकांचा पराभव

किडनीचा त्रास असल्याने फिर्यादी हे आरोपी नर्स सविता काम करीत असलेल्या रुग्णालयात डायलिसीससाठी जात होते. तेथे त्यांच्यात मैत्री झाली. चॅटिंग सुरु झाले. दोन-तीन वेळा बाहेर भेटले, त्याचाच गैरफायदा घेत आरोपी नर्सने या रुग्ण फिर्यादीला आपल्या जाळ्यात ओढले होते. पण, वाकड पोलिस ठाण्यातील पीआय संतोष पाटील, एपीआय संतोष पाटील, अभिजित जाधव व पथकाने हा हनीट्रॅप फेल केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com