Shirur Pickup Accident : पोलिस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने दुचाकीस्वाराला उडविले, तरूणाचा जागीच मृत्यू

Bike rider dies on the spot : धडक दिल्यानंतर पिकअप गाडीने मोटारसायकलसह गाडी चालविणाऱ्या तरुणाला 20 ते 30 फूट फरफटत नेले. यामध्ये गाडी चालविणारा तरुण जागीच ठार झाला तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला.
Pickup Accident
Pickup AccidentSarkarnama

Shirur News : पुण्यातील कल्याणीनगर भागात पोर्श कारच्या अपघाताची घटना ताजी असतानाच आता शिरूर तालुक्यात भीषण अपघात घडला आहे. एका पोलिस पाटलाच्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने पिकअप गाडीने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीवरील 30 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला.

हा अपघात इतका गंभीर होता की, धडक दिल्यानंतर पिकअप गाडीने मोटारसायकलसह गाडी चालविणाऱ्या तरुणाला 20 ते 30 फूट फरफटत नेले. यामध्ये गाडी चालविणारा तरुण अरुण मेमाणे जागीच ठार झाला तर दुसरा तरुण महिंद्र बांडे गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी या अपघाताची प्राथमिक माहिती दिली. शिरुर (Shirur) तालुक्यातील अरणगावातील पोलिस पाटील संतोष लेंडे यांचे कुटूंब मालवाहतूक पिकअप घेऊन चालले होते. या गाडीमध्ये त्यांचे आई, वडील, मुलगा, मुलगी असे प्रवास करत होते.

ही पिकअप गाडी त्यांची 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी चालवित होती. तर पोलिस पाटील असलेले संतोष लेंडे तिच्याशेजारी बसले होते. या अल्पवयीन मुलीने पिकअप चालविताना समोरून येत असलेल्या दुचाकीला जोरधार धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की, दुचाकीवरील दोघे फरफटत पुढे गेले. यामध्ये दुचाकीस्वार मेमाणे याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा एकजण गंभीर जखमी झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा

Pickup Accident
Pune Porsche Accident : पोर्श कार अपघात प्रकरणात अजितदादांचा पोलिस आयुक्तांना फोन? स्वतःच दिले उत्तर

या अपघातामध्ये जखमी झालेल्या महिंद्र बांडे यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. या अपघात प्रकरणी शिक्रापुर पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत. या अपघातामधील पिकअप तसेच अपघातग्रस्त दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुढील तपास केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Pickup Accident
Pune Porsche Accident : अजितदादांकडून सुनील टिंगरेंची पाठराखण, 'दबाव आणला नाही...'

पुण्यातील कल्याणीनगरची घटना नक्की काय

कल्याणीनगर भागात भरधाव पोर्श गाडीने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली होती. 19 मे रविवारी मध्यरात्री ही घटना घडली होती. शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने दारू पिऊन भरधाव वेगाने गाडी चालवून हा अपघात केला होता. यामध्ये दुचाकीवरील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला होता.

या अल्पवयीन मुलाला बाल न्याय मंडळाने अवघ्या 15 तासात जामीन मंजूर केला होता. त्यानंतर यावर सर्वच स्तरातून जोरदार टीका होत पोलिस आणि न्याय मंडळाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. सध्या या प्रकरणात संबधित अल्पवयीन मुलाचे वडील, आजोबा, आईसह ससून मधील दोन डॉक्टर, शिपाई यांना अटक केली आहे.

Pickup Accident
Pune Porsche Accident : वडील, आजोबानंतर आता अल्पवयीन मुलाच्या आईला पोलिसांकडून अटक, कारण काय?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com