Baramati News : बारामतीत पुन्हा राजकीय वातावरण तापणार; पवार विरुद्ध पवार भिडणार!

Ajit Pawar V/S Yugendra Pawar : युगेंद्र पवार बारामतीत सक्रिय झाल्याने लोकसभेला बारामतीत झालेला पवारविरुद्ध पवार, असा सामना विधानसभेला देखील बघायला मिळेल. अजित पवार बारामतीत पुन्हा सक्रिय झाल्याने, या चर्चेला अधिकच उधाण आले आहे.
ajit pawar yugendra pawar
ajit pawar yugendra pawarsarkarnama

Pune News : महाराष्ट्रामध्ये पाचव्या टप्प्यामधील प्रचाराची सांगता झाली. मुंबई, नाशिकसह महाराष्ट्रातील इतर लोकसभेच्या जागांवर मतदान उद्या सोमवारी मतदान होईल. प्रचाराच्या तोफा थंडावल्याने अडीच महिने प्रचारामध्ये व्यस्त असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीमध्ये ऍक्टिव्ह झाले. परिसरात सकाळी विकासकामांचा पाहणी दौरा केला. Politics of Ajit Pawar and his nephew Yugendra Pawar

उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar बारामती लोकसभा मतदारसंघाचा प्रचार आटोपल्यानंतर शिरूर आणि इतर पुणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचारात व्यस्त होते. चौथ्या टप्प्यातील मतदानानंतर त्यांनी प्रकृती काहीशी अस्वस्थ होती. त्यामुळे त्यांनी काही काळ विश्रांती घेतली. पाचव्या टप्प्यातील निवडणुकांच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात अजित पवार मुंबईमध्ये प्रचारात ॲक्टिव्ह दिसले. आता प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर लगेचच त्यांनी बारामती दौरा ठरवून आज सकाळी बारामतीमध्ये हजेरी लावली. नेहमीप्रमाणे सकाळी सकाळी विकासकामांची पाहणी करून ते वैयक्तिक गाठीभेटी आणि जनता दरबार घेतला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बारामती मतदारसंघात लोकसभा निवडणुकीनिमित्ताने अजित पवार सातत्याने बारामतीमध्ये तळ ठोकून होते. बारामतीमध्ये त्यांनी व्यापाऱ्यांसह विविध घटकांचे मेळावे घेतले. बारामतीमधील प्रलंबित विकासकामांसाठी आचारसंहिता संपल्यावरती पाठपुरावा करून कार्यवाही करणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले.

दरम्यान, अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार Yugendra Pawar सध्या बारामतीमध्ये ॲक्टिव्ह आहेत. शरद पवार Sharad Pawar यांच्या पक्षात सहभागी झालेले युगेंद्र आठवड्यातील मंगळवारी पक्षाच्या कार्यालयात बसून नागरिकांच्या समस्या सोडवणार असल्याचे सांगण्यात येते. त्या माध्यमातून ते आगामी विधानसभा निवडणुकीची चाचपणी करत असल्याचे देखील बोलले जाते. लोकसभेला बारामतीत झालेला पवारविरुद्ध पवार असा सामना विधानसभेला देखील बघायला मिळेल, अशी चर्चा सुरू आहे. यातच अजित पवार बारामतीत पुन्हा अॅक्टिव्ह झाल्याने, या चर्चेला अधिकच उधाण आले आहे.

ajit pawar yugendra pawar
Sharad Pawar यांचा एकेरी उल्लेख, बघा Gopichand Padalkar काय म्हणाले ? | BJP | NCP | Sarkarnama Video

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com