Sharad Pawar News: ...एवढंच सांगतो, हा आत्मा तुम्हाला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही; पवारांचा सांगता सभेत 'सिक्सर'

Sharad Pawar BKC Sabha: ज्या बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला पडत्या काळात मतद केली, त्यांचे उपकार तुम्ही विसरला असला तरी, महाराष्ट्रातील मराठी माणूस ते उपकार विसरणार नसल्याचं शरद पवार म्हणाले. तसेच यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'भटकती आत्मा' अशी टीका केल्याच्या वक्तव्याचाही समाचार घेतला.
Sharad Pawar, Narendra Modi
Sharad Pawar, Narendra ModiSarkarnama

Mahavikas Aghadi BKC Sabha: महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या मुंबईमधील प्रचार सांगता सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) सडकून टीका केली.

तसेच ज्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला पडत्या काळात मतद केली, त्यांचे उपकार तुम्ही विसरला असला तरी, महाराष्ट्रातील मराठी माणूस ते उपकार विसरणार नसल्याचं शरद पवार म्हणाले. तसेच यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'भटकती आत्मा' अशी टीका केल्याच्या वक्तव्याचाही समाचार घेतला.

मुंबईतील बीकेसी मैदानातील सभेत बोलताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, यंदाची लोकसभेची निवडणूक माझ्यासह देशातील सर्व लोकांच्या भवितव्याची निवडणूक आहे. याआधी आपण अनेक निवडणुका पाहिल्या आहेत. मागच्या सर्व राज्यकर्त्यांनी संसदीय लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले. परंतू स्वातंत्र्यानंतरची ही पहिली निवडणूक अशी आहे की, देशासमोर संविधान आणि लोकांचे मूलभूत अधिकार कसे वाचवायचे हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आज सत्तेचा वापर प्रधानमंत्र्याच्या विरोधात भूमिका मांडणाऱ्याला उद्ध्वस्त करण्यासाठी केला जात आहे. जे लोक आपल्या विचाराचे नाहीत त्यांना तुरुंगात टाकलं जात आहे. अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी दिल्लीत चांगलं काम करुनही त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. मी म्हणेल तीच लोकशाही हा एककल्ली कार्यक्रम मोदींनी घेतला आहे, असा हल्लाबोल शरद पवारांनी यावेळी बोलताना केला.

Sharad Pawar, Narendra Modi
Arvind Kejariwal News : दिल्लीतच नाही,तर केजरीवालांची मुंबईतही मोदींना ‘टशन’; ठाकरे, पवारांचा उल्लेख थेट असली...

हा आत्मा तुम्हाला सत्तेपासून दूर केल्याशिवाय राहणार नाही

यावेळी बोलताना पवारांनी शिवसेनेचा फोडल्याच्या मुद्द्यावरुनही भाजपला सुनावलं, पवार म्हणाले, तुम्ही शिवसेना (Shivsena) फोडली, ज्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला संकटाच्या काळात वाचवण्याचं काम केलं. ते सर्व उपकार तुम्ही विसरला आहात. परंतू तुम्ही काहीही म्हणला, काहीही टीका केली तरीही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील मराठी माणूस बाळासाहेब ठाकरेंचे उपकार विसरलेला नाही. तसंच यावेळी त्यांनी मोदींच्या भटकती आत्मा या वक्तव्याचाही समाचार घेतला. पवार म्हणाले, "मला कुणीतरी भटकता आत्मा आहे असं म्हणालं. पण आत्मा माणूस गेल्यानंतर असतो यांना आमची चिंता पडली आहे. परंतू एवढंचं सांगतो हा आत्मा तुम्हाला सत्तेपासून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही."

(Edited By Jagdish Patil)

Sharad Pawar, Narendra Modi
Narendra Modi Mumbai Sabha: राज ठाकरेंचे मोदी-शहा कनेक्शन व्हाया फडणवीसच..., पाहा कोणाची खुर्ची कुठे कशी?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com