Daund Politics : ‘दौंडच्या विकासाचा नुसताच भास...’; ‘त्या’ फलकांनी तापले तालुक्याचे राजकारण!

Assembly Election 2024 : आमदार राहुल कुल यांना पक्षातील निष्ठावंत, महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांच्या नाराजीचा तसेच महाविकास आघाडीच्या विरोधाचा सामना करावा लागणार आहे.
Daund Flex
Daund Flex Sarkarnama
Published on
Updated on

Pune, 24 September : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यातील राजकीय वातावरणही तापू लागले आहे. भाजपचे आमदार राहुल कुल यांना घेरण्यासाठी विरोधकांकडून विविध मुद्दे उपस्थित केले जात आहे.

टक्केवारी, पोलिस ठाण्याचा वापर आणि भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे खासगीकरण या मुद्द्यांचे भांडवल करत या संदर्भातील फलक तालुक्यात झळकल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या फलकांची चर्चा रंगल्याने संबंधित यंत्रणेला सांगून हे फलक हटविण्यात आले आहेत, त्यामळे चर्चेला आणखी उधाण आले आहे.

दौंडमध्ये राहुल कुल (Rahul Kul ) हे सध्या भाजपचे आमदार असून महायुतीमधील जागा वाटपात त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. कुल यांनी पहिल्या पाच वर्षात कोट्यवधींची कामे केल्याचा दावा केला आहे. त्यांच्या ताब्यातील भीमा सहकारी साखर कारखाना बंद अवस्थेत असल्याचे भांडवल करूनही कुल यांनी मागील निवडणुकीत 746 मतांनी निसटता विजय मिळवला. या पाच वर्षांतही कोट्यवधींचा निधी आणल्याचा आमदार फुल यांचा दावा आहे.

लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि महायुतीच्या बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची दौंड तालुक्यातील (Daund Taluka) धुरा आमदार राहुल कुल यांच्याकडे होती. तसेच राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश थोरात हे सोबत असतानाही दौंड तालुक्यात सुप्रिया सुळे यांना 25 हजारांपेक्षा जास्त मतांचे लीड मिळाले. त्यामुळे आमदार कुल यांचे टेन्शन वाढले आहे.

आमदार राहुल कुल यांना पक्षातील निष्ठावंत, महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांच्या नाराजीचा तसेच महाविकास आघाडीच्या विरोधाचा सामना करावा लागणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुल यांच्या विरोधातील वातावरण तापवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे.

Daund Flex
Amit Shah Tour : अमित शहांचा दौरा म्हणजे फडणवीस, बावनकुळेंसाठी एक प्रकारचा सिग्नल; जयंत पाटलांचा निशाणा

त्यातूनच दौंड तालुक्यातील काही महत्त्वाच्या गावांत पुणे-सोलापूर महामार्गालगत भीमा सहकारी साखर कारखान्याचे खासगीकरण, निवृत्त कर्मचाऱ्यांचे देणी, तसेच विकासकामांतील टक्केवारी, विरोधकांना त्रास देण्यासाठी पोलिस ठाण्याचा वापर असे फलक लावण्यात आले होते.

महामार्गावरील गावांत हे फलक झकळल्याने त्याची दौंड तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे. हे फलक तातडीने हटविण्यात आले आहेत. मात्र, तातडीने काढलेल्या फलकांची चर्चा सोशल मीडियावर जोरदार रंगू लागली आहे.

विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांना उत्तर देत, भाजपवर असलेली नाराजी कशी दूर करणार आणि सुप्रिया सुळे यांना मिळालेले लीड कसे तोडणार याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष असणार आहे. दुसरीकडे, महायुतीकडून कुलांची उमेदवारी निश्चित असल्याने त्यांचे पारंपारिक विरोधक रमेश थोरात आणि माजी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांनीही विधानसभेसाठी रणशिंग फुंकले आहे, त्यामुळे तालुक्यात महायुतीत फूट अटळ मानली जात आहे.

माजी रमेश थोरात हे तुतारी हाती घेणार की अपक्ष लढणार हेही महत्वाचे ठरणार आहे. तसे झाले तर महाविकास आघाडीचा तिसरा उमेदवारही रिंगणात येऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून दौंड तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, प्रदेश सरचिटणीस नामदेव ताकवणे, दिग्विजय जेधे, वंदना मोहिते, डॉ. भरत खळतकर यांची नावे इच्छुक म्हणून चर्चेत आहेत.

Daund Flex
Ajit Pawar Vs Vikhe Patil : अजित पवार अन्‌ विखे पाटील यांच्यात खडाजंगी; अर्थमंत्री म्हणाले ‘निधी आणायचा कोठून...’

दरम्यान, इतर पक्षातून आलेल्या नेत्याला उमेदवारी देण्याऐवजी निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत करण्यात आली. एकंदरितच आमदार राहुल कुल यांच्यावर झालेले आरोप, महाविकास आघाडीतील शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांची निष्ठावंतांना उमेदवारीची मागणी यामुळे दौंड तालुक्याचे राजकारण चांगलेच तापले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com