Baramati Loksabha : बारामतीच्या उमेदवारीचा दौंड राष्ट्रवादीने संपवला सस्पेन्स; अजितदादांच्या निकटवर्तीयाने पटेलांना पाठविले 'हे' नाव

Mahayuti News : बारामती लोकसभा मतदारसंघाचे अजित पवार यांनी 1991 मध्ये प्रतिनिधित्व केले आहे.
Sunetra Pawar
Sunetra Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Daund News : बारामती लोकसभा मतदारसंघातून मी उभा केलेल्या उमेदवारालाच मतदान करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. मात्र, बारामतीतून उमेदवार कोण असणार, याची प्रचंड उत्सुकता आहे. काही नावे चर्चेतही आहेत. मात्र, दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. (Daund NCP demands Sunetra Pawar to be candidate from Baramati)

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांना दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसकडून पत्र पाठविण्यात आले आहे. ते काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू सहकारी तथा दौंड शुगर कारखान्याचे संस्थापक संचालक वीरधवल जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत ही मागणी केली आहे. (Baramati Loksabha)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sunetra Pawar
Abhishek Ghosalkar Shot Dead : इतना सन्नाटा क्यो हैं भाई...? अभिषेकच्या हत्येनंतर घोसाळकर कुटुंबीय पुरते हादरले

दरम्यान, सुनेत्रा पवार यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळाली, तर खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी त्यांची लढत होण्याची शक्यता आहे. म्हणजे बारामतीत नणंद आणि भावजयमध्ये सरळ लढतीचे संकेत मिळत आहेत.

जगदाळे म्हणाले, दौंड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याची ‘सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघासाठी सुयोग्य उमेदवार आहेत,’ अशी भावना आहे. सुनेत्रा पवार यांनी दौंड तालुक्यात एन्व्हाॅयर्न्मेंटल फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून ओढ्यांचे खोलीकरण व रुंदीकरणाची कामे केली आहेत. त्यातून सिंचनाच्या सुविधा वाढल्या आहेत.

Sunetra Pawar
Bhagirath Bhalke : स्पेशल प्लेन पाठवलं...प्रवेशाला अख्खं मंत्रिमंडळ आलं...तरीही भगीरथ भालके BRSमध्ये सक्रिय होईनात

सुनेत्रा पवार यांनीच दौंड शुगर कारखान्याच्या उभारणीसाठी अजित पवारांकडे आग्रह धरला होता. त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्याच हस्ते 2008 मध्ये दौंड तालुक्यातील आलेगाव येथे कारखान्याचे भूमिपूजन करण्यात आले, असेही जगदाळे यांनी स्पष्ट केले

Sunetra Pawar
Satara Politics : पृथ्वीराजबाबांमुळेच गोरे आज नेते म्हणून मिरवित आहेत; काँग्रेसचा चव्हाणांसह भोसलेंवर पलटवार

महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार या निवडून येण्यामध्ये कोणतीही अडचण असणार नाही. केंद्रात आणि राज्यातील सत्तेतील खासदार म्हणून बारामती मतदारसंघाच्या विकासासाठी उपयोग होणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाचे अजित पवार यांनी १९९१ मध्ये प्रतिनिधित्व केले आहे. आता सुनेत्रा पवार यांनी प्रतिनिधित्व करावे, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे, असेही वीरधवल जगदाळे यांनी सांगितले.

Edited By : Vijay Dudhale

R

Sunetra Pawar
Maratha Reservation : ॲड. सदावर्तेंना बारसकरांनी माहिती पुरवली; मराठा समाजाच्या बैठकीत दाखवला भेटीचा फोटो...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com