Pooja Khedkar News : मोठी बातमी! पूजा खेडकरांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांवर केला गंभीर आरोप, म्हणाल्या...

Pooja Khedkar serious allegations against Pune District Collector : पूजा खेडकर यांनी ही तक्रार सोमवारी रात्री उशीरा नोंदवली, जेव्हा त्यांनी वाशिम पोलिसांना आपल्या शासकीय निवास्थानी बोलावलं होतं.
IAS Pooja Khedkar 2
IAS Pooja Khedkar 2Sarkarnama
Published on
Updated on

Controversial IAS Pooja Khedkar News Update : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे. कारण, या प्रकरणात दररोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. मंगळवारी पूजा खेडकर यांचे प्रशिक्षण स्थगित करण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून आल्या्यानंतर, आता याप्रकरणात आणखी एक अपडेट समोर आली आहे. आता पूजा खेडकर यांनीे पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवे यांच्याकडून त्यांचा छळ झाल्याचा आरोप केला आहे.

पूजा खेडकर(Pooja Khedkar) यांनी ही तक्रार सोमवारी रात्री उशीरा नोंदवली, जेव्हा त्यांनी वाशिम पोलिसांना आपल्या शासकीय निवास्थानी बोलावलं होतं. यामुळे आता पुन्हा एकदा या प्रकरणात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

ट्रेनिंग कालावधीत मोठ्या मागण्या करणाऱ्या आयएएस पूजा खेडकर यांचे जिल्हा प्रशिक्षण थांबवण्यात आले आहे. याबाबत राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे यांना लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमी, मसुरीतून सूचना करण्यात आली आहे.

IAS Pooja Khedkar 2
Pooja Khedkar : IAS अधिकारी पूजा खेडकर यांना मोठा दणका! जिल्हा प्रशिक्षण तत्काळ थांबवलं

तसेच, पुढील कारवाईसाठी कुठल्याही परिस्थितीत तत्काळ लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमी, मसुरी येथे रिपोर्ट करा. 23 जुलैपूर्वी हजर व्हावेच लागेल, असे आदेशही खेडकर यांना दिले आहेत. राज्य सरकारने 11 जुलै रोजी सविस्तर अहवाल दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, पूजा खेडकरने रेशनकार्ड दाखवून आपलं अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळविले असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. पिंपरी-चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयातून (वायसीएम) खेडकर यांनी अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळविल्याचे समोर आले आहे. हे सर्टिफिकेट काढताना त्यांनी आपली संपत्ती देखील लपविल्याचा आरोप कुंभार यांनी केला.

IAS Pooja Khedkar 2
Pooja Khedkar : पूजा खेडकर यांनी स्वत: पोलिसांना बोलवले; गेस्ट हाऊसवर दोन तास बैठक...

पूजा खेडकर प्रकरणात पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला(Rashmi Shukla) यांनी लक्ष घातलं आहे. खासगी मोटारीवर लाल-निळ्या अंबर दिव्याचा केलेला वापर,खेडकर यांच्या आईनं शेतकऱ्याला पिस्तुलाचा दाखविलेला धाक आणि त्यांनी मिळवलेले दिव्यांग प्रमाणपत्र या सर्व प्रकारांचा अहवाल रश्मी शुक्ला यांनी मागवला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com