Porsche Car Accident Update : पुणे अपघातप्रकरणी सोमवारी सुनावणी; पोलिसांनी उचललं मोठं पाऊल...

Pune Hit And Run Case : अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल आगरवाल यांच्या कोठडीबाबत उद्या सोमवारी (ता. 27) सुनावणी आहे. यावेळी गुन्हे शाखा आगरवाल यांचा ताबा मागण्याची शक्यता आहे.
Pune Porsche Car Accident
Pune Porsche Car AccidentSarkarnama

Pune Crime News : पुण्यातील कल्याणीनगरमधील पोर्श कार अपघात प्रकरणी तपासाच्या दृष्टीने पुणे पोलिसांनी जोरदार हालचाली सुरू केला आहेत. या प्रकरणाचा तपासाचा आढावा घेण्यासाठी आणि तपासाची दिशा ठरवण्यासाठी ऐन रविवारी (ता. 26) पोलिस आयुक्तालयात बैठक पार पडली. यावेळी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह पोलिस सह आयुक्त, अपर पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त आदी आधिकारी उपस्थित होते. Porsche Car Accident Update

पुण्यातील हिट अॅन्ड रन प्रकरण Pune Hit And Run Case गुन्हे शाखेकडे दिल्यानंतर तपासाची संपूर्ण दिशा बदलून वेग येणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल आगरवाल यांच्या कोठडीबाबत उद्या सोमवारी (ता. 27) सुनावणी आहे. यावेळी गुन्हे शाखा आगरवाल यांचा ताबा मागण्याची शक्यता आहे. आरोपीचे वडील आणि आजोबा यांची एकत्रित चौकशी करण्याची शक्यता आहे. यावर चर्चा करण्यासाठीच वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक झाल्याची माहिती आहे.

कल्याणीनगर येथील झालेल्या अपघातानंतर अल्पवयीन आरोपीस पोलिसांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर स्थानिक आमदाराने दबाव आणल्याचा आरोप झाला. तसेच आरोपीस गंभीर गुन्हा करूनही काही तासांतच जामीन मिळाल्याने पोलिसांच्या कारभारावर सर्व स्तरातून टीका करण्यात आली. यानंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमारांनी Amitesh kumar कडक पावले उचलून दोन अधिकाऱ्यांचे निलंबन केले. तसेच या अपघाताच तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pune Porsche Car Accident
Maratha Reservation News : बीडच्या महसूल प्रशासनाची कमाल; तब्बल 82 हजारांवर कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप

या प्रकरणातील आरोपीच्या वडील विशाल अगरवाल हे न्यायालयीन कोठडीत असून त्यांच्याबाबत उद्या सुनावणी होणार आहे. तर आरोपीचे आजोबा सुरेंद्र अगरवाल यांनी चालकावर गुन्हा अंगावर घेण्यासाठी दबाव आणल्याने अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी तपास जलद गतीने करण्यासाठी गुन्हे शाखा विशाल अगरवालचा तबा घेण्याच्या तयारीत आहे. आता अगरवाल यांच्या ताब्याबाबत न्यायालय काय निर्णय देणार, याकडे लक्ष आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Pune Porsche Car Accident
Jalna Lok Sabha Analysis : रावसाहेब दानवेंशी मैत्री; मग गोरंट्याल यांची साथ कल्याण काळेंना मिळाली का?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com