Maratha Reservation News : बीडच्या महसूल प्रशासनाची कमाल; तब्बल 82 हजारांवर कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप

Beed Kunbi Certificate Distribution : निजामकालीन दस्तऐवजांसह जन्ममृत्यू नोंदणी रजिस्टर (गाव नमूना 14), खासरा पत्रक, पाहणी पत्रक, जनगणना रजिस्टर, गाव नमुना क्रमांक सहा, प्रवेश निर्गम रजिस्टर, हक्क नोंदवही या 1913 ते 1967 पर्यंतच्या कागदपत्रांमध्ये कुणबी जातीच्या नोंदी शोधण्यात आल्या.
Deepa Mudhol Munde
Deepa Mudhol MundeSarkarnama

Beed News : मराठा - कुणबी, कुणबी - मराठा, कुणबी जात अशा जुन्या दस्तऐवजांच्या शोधात सापडलेल्या नोंदीचे वारसांना प्रमापत्रांच्या वाटपात बीड जिल्हा महसूल प्रशासनाने आघाडी घेतली आहे. जिल्ह्यात तब्बल 82 हजार 454 मराठा - कुणबी, कुणबी - मराठा, कुणबी जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. विशेष म्हणजे मागच्या सव्वा महिन्याच्या लोकसभा निवडणूक प्रक्रीयेच्या काळातही प्रशासनाने तब्बल 18 हजार या प्रमाणपत्रांचे वाटप केले आहे.

मराठा समाजाला सरकसट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे Manoj Jarange यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे अमरण उपोषण सुरू केले. त्यानंतर शासनाने कुणबी जात प्रमाणपत्रांसाठी निवृत्त न्यायमुर्ती संदीप शिंदे यांची समिती स्थापन केली. निजामकालीन दस्तऐवजांसह जन्ममृत्यू नोंदणी रजिस्टर (गाव नमूना 14), खासरा पत्रक, पाहणी पत्रक, जनगणना रजिस्टर, गाव नमुना क्रमांक सहा, प्रवेश निर्गम रजिस्टर, हक्क नोंदवही या 1913 ते 1967 पर्यंतच्या कागदपत्रांमध्ये कुणबी जातीच्या नोंदी शोधण्यात आल्या.

निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, कारागृह अधीक्षक, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पोलिस उपाधीक्षक (गृह), अधीक्षक उत्पादन शुल्क या अधिकाऱ्यांच्या समित्यांकडून जिल्ह्यात 27 लाख पाच हजार 210 दस्तावेजांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 21 हजार 907 कुणबी नोंदी आढळल्या.

दरम्यान, मराठा समाजाला Maratha Resevation सरसकट कुणबी प्रमणापत्र व आरक्षण देण्याच्या मागणीचा मुद्दा कायम आहे. त्यानंतर शासनाने समाजाला स्वतंत्र 10 टक्के आरक्षण दिले आहे. मात्र, ज्यांच्या कुणबी नोंदी आढळल्या अशा वारसांना प्रशासनाकडून कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप केले जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल 82 हजार 545५ मराठा - कुणबी, कुणबी - मराठा, कुणबी जात प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत हे जात प्रमाणपत्र वाटप केले जात आहे. महा ई सेवा केंद्रांवरुन देखील सदर प्रमाणपत्र वाटप केले जाते.

Deepa Mudhol Munde
Nitish Kumar On Narendra Modi : आकड्यांच्या गोंधळानंतर आता मोदींच्या पदाचाही घोळ; नितीशकुमार नेमके काय म्हणाले?

कुणबी - जात प्रमाणपत्र वाटपात बीड तालुका आघाडीवर असून या तालुक्यातून 15318 प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. बीड तालुक्यात एकही अर्ज नामंजूर नसल्याची माहिती, उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी दिली. बीडनंतर गेवराईतून 13173, आष्टी तालुक्यातून 13154, केज 11300, शिरुर कासार तालुक्यात 4138, पाटोदा तालुक्यात 9085, माजलगाव 5337, धारुर 2646, वडवणी 2961, अंबाजोगाई 5045 तर परळी तालुक्यात 388 प्रमाणपत्रांचे वितरण झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बीड जिल्हा कुणबी, कुणबी - मराठा, मराठा कुणबी - जात प्रमाणपत्र वाटपात आघाडीवर राहिला आहे. मराठवाडा विभागात कुणबी नोंदी सापडण्यात आघाडीवर असलेल्या बीड जिल्ह्याने मराठा - कुणबी, कुणबी - मराठा, कुणबी जात प्रमाणपत्र वाटपात राज्यात आघाडी घेतली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Deepa Mudhol Munde
Jalna Lok Sabha Analysis : रावसाहेब दानवेंशी मैत्री; मग गोरंट्याल यांची साथ कल्याण काळेंना मिळाली का?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com