Porsche Hit And Run Case : चौकशी समिती म्हणजे 'उंदराला मांजराची साक्ष', माजी आयएएस अधिकारी झगडेंचा गंभीर आरोप !

Pune Porsche Accident : या प्रकरणात वाढत असलेला जनप्रक्षोभ लक्षात घेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वता : यामध्ये लक्ष घालत या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलिस आयुक्तांना दिल्या होत्या. यानंतर या प्रकरणामध्ये अनेक महत्वाच्या घडामोडी समोर आल्या आहेत. या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल, आजोबा सुरेंद्रकुमार अगरवाल यांनी ड्रायव्हरवर दबाव टाकत हा गुन्हा नावावर घेण्यास सांगितले होते..
Porsche Hit And Run Mahesh Zagade
Porsche Hit And Run Mahesh ZagadeSarkarnama

Pune Accident News : पुण्यातील कल्याणीनगर मध्ये गेल्या आठवड्यात घडलेल्या अपघात प्रकरणात नवीन गोष्टी समोर येत आहेत. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने पोर्श गाडी चालवून एका दुचाकीला धडक दिली.

यामध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या दोन अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये एका तरूण, तरूणीचा समावेश होता. यानंतर गाडी चालविणाऱ्या अल्पवयीन आरोपीला जोरदार चोप देत नागरिकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणात सुरूवातीपासूनच या अल्पवयीन मुलाला वाचविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला जात आहे.

दोन जणांना उडवून त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या या अल्पवयीन आरोपीला अवघ्या 15 तासात बालहक्क न्याय मंडळाने जामीन दिला होता. त्यामुळे या घटनेची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू होऊन पोलिस आणि न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

या प्रकरणात वाढत असलेला जनप्रक्षोभ लक्षात घेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वता: यामध्ये लक्ष घालत या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलिस आयुक्तांना दिल्या होत्या.

यानंतर या प्रकरणामध्ये अनेक महत्वाच्या घडामोडी समोर आल्या आहेत. या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल, आजोबा सुरेंद्रकुमार अगरवाल यांनी ड्रायव्हरवर दबाव टाकत हा गुन्हा नावावर घेण्यास सांगितले होते. यासाठी त्याला पैशाचे आमिष दाखविण्यात आले होते. यासाठी ड्रायव्हरला डांबून देखील ठेवण्यात आले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Porsche Hit And Run Mahesh Zagade
Porsche Hit And Run Case : पुणे 'हिट अ‍ॅण्ड रन' जनआक्रोशापुढे सरकारचे 'डॅमेज कंट्रोल' झाले निष्प्रभ !

या अल्पवयीन आरोपीचे तपासणीसाठी दिलेले रक्ताचे नमुने (ब्लड सॅम्पल) ससून हॉस्पिटलमध्ये थेट बदलण्यात आले. ससून रुग्णालयातील डॉ.अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांनी तीन लाख रूपये घेत हा उद्योग केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.

त्यानंतर पोलिसांनी (Police) या दोन्ही डॉक्टरांसह अन्य एका व्यक्तीला अटक केली आहे. या संपूर्ण प्रकरणात अडकलेल्या डॉक्टरांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने आता त्रिसदस्य समिती नेमली आहे. जेजे रुग्णालयाच्या डीन डॉ.पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली आहे. मात्र ही समिती म्हणजे 'उंदराला मांजरीची साक्ष'असा हा प्रकार असल्याचा आरोप केला जात आहे.

माजी आयएस (IAS) अधिकारी आणि राज्याच्या अन्न व औषध विभागाचे प्रधान सचिव महेश झगडे यांनी देखील या समितीवर आक्षेप घेतले आहेत. झगडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून यावर हल्ला चढविला आहे.

या प्रकरणात अडकलेल्या दोषी डॉक्टर्सची चौकशी करण्यासाठी इतर काही गंभीर प्रकरणात अडकलेल्या दुसऱ्या डॉक्टरची नियुक्ती करणे म्हणजे उंदराला मांजरा साक्ष ही म्हण पुनर्जिवित करण्याचा चंग तर वरिष्ठांनी बांधलेला नाही ना? राज्यात या चौकशीसाठी इतर त्रयस्थ व्यक्ती उपलब्ध नसतील तर त्रयस्थांचा दुष्काळ जाहीर करावा, असा हल्लाच महेश झगडे यांनी केला आहे.

समितीच्या अध्यक्षांवरच भ्रष्टाचाराचे आरोप

या अपघातानंतर अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल डॉ. श्रीहरी हळनोर आणि डॉ.अजय तावरे यांनी बदलल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले. त्यांच्या चौकशीसाठी राज्य सरकारने जेजे रुग्णालयाच्या डीन डॉ. पल्लवी सापळे, मुंबईतील डॉ. गजानन चव्हाण आणि छत्रपती संभाजीनगरमधील डॉ. सुधीर चौधरी यांची समिती नेमली.

या समितीमधील डॉक्टरांवर आरोप आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांनी डॉ. सापळे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. डॉ.सापळे मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असताना तसेच आता जेजे रुग्णालयात अनेक प्रकरणात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Porsche Hit And Run Mahesh Zagade
Pune Porsche Accident : मोठी बातमी, अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलले ; त्रिसदस्यीय समितीमार्फत होणार चौकशी !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com