Porsche Hit And Run Case : पुणे 'हिट अ‍ॅण्ड रन' जनआक्रोशापुढे सरकारचे 'डॅमेज कंट्रोल' झाले निष्प्रभ !

Pune Porsche Accident : पुणे 'हिट अ‍ॅण्ड रन' प्रकरणात पोलिसांकडून झालेले डॅमेज कंट्रोल करण्यासाठी सरकाने प्रयत्न केला, मात्र जनआक्रोश आणि नव्याने समोर आलेल्या रक्ताचे नमुने बदलण्यासारख्या प्रकारांमुळे ते प्रयत्न निष्प्रभ ठरले आहेत.
Pune Porsche Accident
Pune Porsche Accident Sarkarnama

Pune Porsche Crash : पुणे हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणावरून पोलिस यंत्रणा आणि सरकारच्या अब्रूचे धिंडवडे निघाले आहेत. सरकारकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न झाला, मात्र पुण्यातील कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांचे प्रयत्न आणि जनआक्रोशामुळे सरकारचा कोंडी झाली आहे. त्यातच दोन जणांचा बळी घेणाऱ्या अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी बदलल्याचे उघड झाल्यामुळे शासकीय यंत्रणा आणि सरकार श्रीमंतांना वाचवण्यासाठी किती तत्परतेने काम करतात, हेही पुन्हा एकदा समोर आले आहे.

19 मेच्या मध्यरात्री घडलेले हे हिट अ‍ॅण्ड रन आणि त्यानंतर आरोपीला वाचवण्यासाठी झालेल्या घडामोडींमुळे पुण्यासह देशाची झोप उडाली. दारूच्या नशेतील अल्पवयीन आरोपीने पोर्श कारने दुचाकीला जोराची धडक दिली. यात एक तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला. अपघाताच्या काही तासांनंतर आरोपीला जामीन मिळाला. त्यानंतर यंत्रणेवर चौफेर टीका झाली.

पहाटे तीन वाजता पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) (अजितदादा पवार गट) आमदार सुनील टिंगरे संबंधित पोलिस ठाण्यात हजर असल्याची माहिती उघड झाली. त्यामुळे लोकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. दोघांचा बळी घेणाऱ्याला वाचवण्यासाठी झालेला हा आटापिटा कमीच होता, आतून आणखी खूप काही घडले होते. प्रकरण अंगलट येणार हे लक्षात येताच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस 21 मे रोजी पुणे पोलिस आयुक्तालयात दाखल झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pune Porsche Accident
Satara NCP News: डॉ. अजय तावरे यांना अटक हा सुसंस्कृत कोरेगावला लागलेला काळा डाग...

फडणवीस यांचा हा डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न होता. समाजात निर्माण झालेला रोष कमी करण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले होते. त्यानंतर पुन्हा एक धक्कादायक माहिती समोर आली. अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुनेच बदलल्याण्यात आले. त्यामुळे त्याला लवकर जामीन मिळण्यास मदत झाली. ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी हे कृ्त्य केले. सामान्य माणसाला पोलिस ठाणे आणि शासकीय रुग्णालयांत मिळणारी वागणूक आणि बिघडलेल्या, बेदरकार श्रीमंतांना मिळाणाऱ्या वागणुकीत किती फरक असतो. हे या प्रकरणामुळे लोकांच्या समोर आले. सरकारची मोठी नाचक्की झाली.

आमदार रवींद्र धंगेकर यांनी या प्रकरणात अगदी सुरुवातीपासून सरकारला धारेवर धरले. विरोधी पक्षाचे आमदार म्हणून त्यांनी आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली. सत्ताधाऱ्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. धंगेकर आहेत कोण, असा प्रतिप्रश्न उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एका पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर पोलिस कर्मचारी पबवाल्यांकडून कशी वसुली करतात, याची छायाचित्रे, व्हिडीओ धंगेकरांनी ट्वीट केले.

त्यामुळे सरकार पुन्हा बॅकफूटवर गेले. त्यानंतर त्यांनी आणखी एक बॉम्ब टाकला. राज्य उत्पादन शुल्क (स्टेट एक्साइज) विभागाच्या कार्यालयात जाऊन त्यांनी आणि शिवसेनेच्या (ठाकरे गट) प्रवक्त्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी पोलखोल करण्याचा प्रयत्न केला. उत्पादन शुल्क विभागाला कुठून किती हप्ते मिळतात, याची यादीच त्यांनी कार्यालयात अधिकाऱ्यांसमोर वाचून दाखवली.

Pune Porsche Accident
Pune Porsche Crash Case: 'हिट अ‍ॅण्ड रन' प्रकरणी मोठी अपडेट; 'पोर्श’ मोटारीच्या तपासणीतून धागेदोरे लागणार हाती..!

धंगेकर स्टंटबाजी करत आहेत, असा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला. त्यांनी पुरावे द्यावेत, असे आव्हान देण्यात आले. रक्ताचे नमुने बदलण्याच्या कृत्यात सहभागी असलेल्या डॉ. अजय तावरे याला ससून रुग्णालयात अदीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार द्यावा, असे शिफारसपत्र आमदार सुनील टिंगरे यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना दिल्याचे समोर आले. अशी पत्रे आम्ही अनेकांना देतो, असे म्हणत आमदार टिंगरे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.आमदार टिंगरे यांच्या विनंतीनुसार डॉ. तावरे याला नियुक्ती द्यावी, असा शेरा मारून हसन मुश्रीफ यांनी ते पत्र ससूनच्या अधिष्ठातांना पाठवले. हे पत्र व्हायरल झाले, त्यामुळे मंत्री मुश्रीफ यांचाही पारा चढला.

Pune Porsche Accident
Sunil Tingre News : 'ते' जुनं पत्र व्हायरल, विरोधकांकडून दिवसभर फायरिंगवर फायरिंग! अन् अखेर रात्री उशिरा...

गरीबांचे काही खरे नाही, गरीबांना वाली नसतो... ही वाक्ये सतत कानावर पडतात. हिट अ‍ॅन्ड रन प्रकरणातील घटनाक्रम हेच सागंतो. यंत्रणा, सरकार श्रीमंतांसाठी पुढाकार घेऊन काम करतात. गरीब असो की श्रीमंत, गुन्हा केला की त्यांना कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे. गरीबांना शिक्षा होते. श्रीमंतांचे काय होते, हे काही प्रकरणांत दिसून आले आहे. पुण्यातील हिट अ‍ॅण्ड रन प्रकरण त्या मालिकेतीलच एक भाग म्हणता येईल.

माध्यमे, समाजमाध्यमांतून आवाज उठला नसता, आमदार धंगेकर यांनी पाठपुरावा केला नसता तर कदाचित हे प्रकरण दाबले गेले असते. लोकांचा आक्रोश आणि त्याला माध्यमांत मिळणारी जागा, यामुळे सरकारला जाग आली. असे असले तरीही ससूनसारख्या रुग्णालयात इतक्या गंभीर प्रकरणातील आरोपीच्या रक्ताचे नमुने कसे बदलले जाऊ शकतात, हा प्रश्न कायम आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Pune Porsche Accident
Pune Hit And Run Case : अधिकाऱ्यांची लाज काढत धंगेकरांची प्रश्नांची सरबत्ती; थेट हप्तेखोरांची यादीच वाचली!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com