Loksabha Election 2024 : संभाजीनगरावर हक्क सांगणारा भाजप अन् शिंदे गट गप्पगार

Chhatrapati Sambhajinagar Loksabha : गेल्या महिन्यात महायुतीच्या मेळाव्यात शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकमेकांना चिमटे काढले होते.
Devendra Fadnavis Chhatrapati Sambhajiangar Loksabha
Devendra Fadnavis Chhatrapati Sambhajiangar LoksabhaSarkarnama
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : देशात लोकसभा निवडणुकीचे ( Loksabha Election 2024 ) वारे वाहायला सुरूवात झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीनं ( Mahavikas Aghadi ) निवडणुकीच्या तयारीला सुरूवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर ( Chhatrapati Sambhajinagar ) लोकसभा मतदारसंघावर हक्क सांगण्याची महायुतीतीत शिवसेना-भाजप दोन प्रमुख पक्षांमध्ये जणू स्पर्धात लागली होती. पण, महायुतीमधील जिल्ह्यातील नेते आणि सध्या गप्पगार पडले आहेत.

( राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा! )

शिवसेना शिंदे गटाचे पालकमंत्री संदीपान भुमरे, प्रवक्ते संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल आणि अधूनमधून अल्पसंख्याक विकास व पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनीही संभाजीनगरची जागा आमची, असा दावा करताना थकत नव्हते. दुसरीकडे, भाजपचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, राज्यातील मंत्री अतुल सावे यांनीही लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त करत महाविकास आघाडीला आव्हान दिले होते. महिनाभरापूर्वी सातत्याने माध्यमांच्या समोर येत संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावर दावा सांगणारे महायुतीचे जिल्ह्यातील नेते आणि मंत्री सध्या शांत आहेत.

Devendra Fadnavis Chhatrapati Sambhajiangar Loksabha
Manoj Jarange Patil On Maratha Reservation : 'जातीतल्याच लोकांना गरीब मराठ्यांचं चांगलं झालेलं बघवत नाही, मनोज जरांगेंनी सुनावले...

गेल्या महिन्यात शहरात महायुतीच्या तीन पक्षांचा एकत्रित मेळावा शहरात पार पडला. यावेळी शिवसेना-भाजप-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकमेकांना चांगलेच चिमटे काढले होते. संजय शिरसाटांनी भागवत कराडांना चिमटा काढत "फक्त स्वतःचे पाहू नका, लोकसभेनंतर येणाऱ्या विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकडे लक्ष असू द्या," असे सांगत फटकारलं होतं.

तेव्हा संभाजीनगरची जागा भाजपच लढवणार, अशा चर्चा सुरू झाल्या होती. पण, महायुतीचा मेळावा झाल्यानंतर पुन्हा शिवसेना-भाजप-राष्ट्रवादीच्या नेत्यांची तोंड जी काही फिरली ती अद्याप एकमेकांकडे वळलेली नाहीत. लोकसभा उमेदवारीबद्दल तर कोणीच 'ब्र' शब्द काढायला तयार नाहीत. उमेदवारीबाबतची ही शांतता वादळापूर्वीची तर नाही ना? अशी चर्चा रंगली आहे.

Devendra Fadnavis Chhatrapati Sambhajiangar Loksabha
Lok Sabha Election 2024 : प्रकाश आंबेडकरांची महाविकास आघाडीतील एन्ट्री परभणीत किती फायद्याची ?

दरम्यान, महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात वरिष्ठ पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत. अशावेळी आपापल्या मतदारसंघात उमेदवारीवर दावे, संभाव्य उमेदवार म्हणून केली जाणारी पोस्टरबाजी अजिबात करू नका, अशा कानपिचक्या राज्यातील महायुतीच्या नेत्यांनी दिल्याचं सांगितलं जात आहे.

उमेदवारी संदर्भातला निर्णय जोपर्यंत जाहीर होत नाही, तोपर्यंत श्रद्ध आणि सबुरी ठेवा, असा संदेशही राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहचवण्यात आला आहे. त्यामुळे आणखी किमान आठवडाभर तरी स्थानिक नेते लोकसभा उमेदवारीबद्दल मौन बाळगून राहतील, असा अंदाज आहे.

Devendra Fadnavis Chhatrapati Sambhajiangar Loksabha
Ashok Chavan News : आंबेडकरांना सोबत घेत अशोक चव्हाणांनी मारली बाजी..! 'एमआयएम'चे काय ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com