Gajanan Kirtikar and Amol Kirtikar : मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात किर्तीकर पिता-पुत्र आमनेसामने?

Loksabha Election 2024 : महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांमधील लढती या चर्चेचा विषय ठरणार आहेत.
Gajanan Kirtikar, Amol Kirtikar
Gajanan Kirtikar, Amol KirtikarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai North-West Constituency : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या शिगेला पोहचली आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडीमधील घटक पक्ष आपले उमदेवार जाहीर करत आहेत. अनेक मतदारसंघात दोन्ही बाजूकडील उमदेवार निश्चित झाले असून उमेदवारांकडून प्रचारही सुरू झाला आहे. तर काही ठिकाणी अद्यापही चर्चेचं गुऱ्हाळ सुरू असून तोडगा निघालेला नाही. अनेक इच्छुक उमेदवारी न मिळाल्याने दुसऱ्या पक्षात जात आहेत. तर काही ठिकाणी पक्षाकडून प्रस्थापितांना डावलून नव्या चेहऱ्याला संधी दिली जात आहे.

महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांमधील लढती या चर्चेचा विषय ठरणार आहेत. अशी एक लढत एका मतदारसंघात पिता-पुत्रात होणार आहे. ज्याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात ठाकरे गटाने उपनेते आणि युवा सेनेचे सरचिटणीस अमोल किर्तीकर(Amol Kirtikar) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर त्यांच्या विरोधात शिंदेच्या शिवसेनेकडून खुद्द त्यांचे वडील गजानन किर्तीकर हे निवडणूक लढण्यास सज्ज झाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता पिता-पुत्र आमनेसामने येणार असल्याचं दिसत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Gajanan Kirtikar, Amol Kirtikar
Anand Paranjpe On Jitendra Awhad : 'राष्ट्रवादी'मधील सूर्याजी पिसाळ जितेंद्र आव्हाडच, आनंद परांजपेंचा हल्लाबोल

गजानन किर्तीकर(Gajanan Kirtikar) हे उत्तर-पश्चिम मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत. ठाकरे गटाने महाविकास आघाडीकडून या मतदारसंघातून अमोल किर्तीकर यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. तर गजानन किर्तीकर यांनीही निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. मला निवडणुकीत लढा असं सांगितलं होतं, असंही गजानन किर्तीकर म्हणाले आहेत.

दरम्यान, काँग्रेस पक्षाने हाकलपट्टी करण्याआधीच संजय निरुपमांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. निरुपम भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा सुरू असताना भाजपमधील मोहीत कंबोज यांनी निरुपमांच्या पक्षप्रवेशाला कडाडून विरोध केला. त्यानंतर संजय निरुपम हे एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र, महायुतीमध्ये उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघ कोणाकडे जाणार हे स्पष्ट न झाल्याने संजय निरुपम शिंदे गटात पक्षप्रवेश करत नसल्याची सूत्रांची माहिती आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Gajanan Kirtikar, Amol Kirtikar
BJP-MNS Alliance: गुढीपाडवा मेळाव्याआधीच फडणवीसांनी मनसेबाबत टाकला मोठा बॉम्ब; म्हणाले, 'महायुतीत मनसे...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com